नाशिक : जिल्ह्यातून जाणाऱ्या रेल्वे मार्गावर असलेल्या १४ रेल्वे क्रॉसिंगपैकी पाच ठिकाणी रेल्वे मार्ग ओलांडण्यासाठी उड्डाणपूल अथवा अंडरपास उभारण्याचा रेल्वे मंत्रालयाने निर्णय घेतल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.याशिवाय उर्वरित ८ ठिकाणीदेखील उड्डाणपूल अथवा अंडरपास बांधण्यालादेखील मंजुरी मिळणार असून यामुळे रेल्वे फाटकांवरील अपघात तसेच नासाडी, इंधनबचतीलादेखील मदत होणार आहे. या पाच ठिकाणी उड्डाणपूल अथवा अंडरपास कामासाठी लवकरच निधी मंजूर होऊन प्रत्यक्षकामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.नाशिक लोकसभा मतदारसंघातील १३ रेल्वे फाटकांच्या ठिकाणांपैकी ५ ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याच्या कामाला रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिल्याचे पत्र काल रेल्वे बोर्डचे अध्यक्ष विनोदकुमार यादव यांनी खासदार गोडसे यांना दिले आहे.ही आहेत ठिकाणे...नाशिकरोड येथील (गेट क्र. ९०) व देवळाली येथील (गेट नं. ८५) या दोन्ही ठिकाणी रेल्वे मार्ग ओलांडण्यासाठी उड्डाणपूल उभारणार.४ ओढा येथील (गेट नं. ९२), अस्वली येथील (गेट नं. ८३ डी. एन.) व लहवित येथील (गेट नं. ८४/१) या तीन ठिकाणी अंडरपास उभारण्यात येणार.
जिल्ह्यातील पाच रेल्वे फाटकांवर उड्डाणपूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2020 1:44 AM
जिल्ह्यातून जाणाऱ्या रेल्वे मार्गावर असलेल्या १४ रेल्वे क्रॉसिंगपैकी पाच ठिकाणी रेल्वे मार्ग ओलांडण्यासाठी उड्डाणपूल अथवा अंडरपास उभारण्याचा रेल्वे मंत्रालयाने निर्णय घेतल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.
ठळक मुद्देअपघात टळतील : रेल्वे बोर्डाने दिली मान्यता