नाशिक : नाशिक मर्चंट बॅँकेच्या निवडणुकीसाठी तीन पॅनल रिंगणात उतरणार असल्याने उमेदवारी अर्ज दाखल झाल्याच्या संख्येवरून लक्षात येत असले तरी, एकाही पॅनलने अद्याप आपल्या उमेदवारांची घोेषणा केलेली नाही. सर्वांचे लक्ष माघारीकडे लागले असून, मंगळवारी शेवटच्या दिवशी निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.बॅँकेच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी १९९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असल्यामुळे या निवडणुकीला किती महत्त्व प्राप्त झाले आहे, याचा अंदाज बांधण्याबरोबरच निवडणूक किती चुरशीची होईल हे आत्ताच दिसू लागले आहे. सत्ताधारी प्रगती व विरोधी सहकार पॅनलमध्येच प्रारंभी लढत होईल, असे भाकित वर्जविले जात होते. परंतु स्व. हुकूमचंद बागमार यांचे पूत्र अजित बागमार यांनी नम्रता पॅनलची घोषणा करून काही उमेदवारही निश्चित केल्यामुळे तिरंग्ांी लढतीचे चित्र दिसू लागले आहे. या निवडणुकीसाठी प्रारंभी बिनविरोधासाठी प्रयत्न करण्यात आले, परंतु आगामी काळात लोकसभा व पाठोपाठ विधानसभा निवडणूक असल्यामुळे व त्यातही मध्य मतदारसंघातून लढणाऱ्यांना मर्चन्ट बॅँकेत स्वत:ची सत्ता प्रस्थापित करावयाची असल्यामुळे बिनविरोधासाठी कोणी माघार घेण्यास तयार झाले नाही. अशातच छगन भुजबळ यांनीही या निवडणुकीत काहीसे लक्ष घातल्यामुळे भाजपानेही बॅँक ताब्यात घेण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांना गळ घातली आहे.एकमेकांना चकवा देण्यासाठी तिन्ही पॅनलकडून दररोज नव नवीन उमेदवारांच्या नावाची चर्चा एकीकडून घडविली जात असताना दुसरीकडे मात्र प्रचाराचा दुसरा टप्पाही सुरू करण्यात आला आहे. पॅनलमधील उमेदवारांना त्यांच्या व्यक्तिगत, राजकीय व सामाजिक हितसंबंध पाहून प्रचाराचा भाग वाटून देण्यात आला आहे. डमी अर्ज आज मागे घेण्यात येणारया निवडणुकीसाठी मंगळवारी माघारीचा अंतिम दिवस असून, शनिवारी पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने माघार घेतली नाही. त्यामुळे आता साºयांचेच लक्ष माघारीकडे लागले आहे. माघारीनंतर तिन्ही पॅनलकडून अधिकृत उमेदवारांच्या नावांची घोेषणा करण्यात येणार असून, पॅनलकडून दाखल करण्यात आलेले डमी अर्ज सोमवारी मागे घेण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
माघारीकडे तिन्ही पॅनलच्या प्रमुखांचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 12:45 AM
नाशिक : नाशिक मर्चंट बॅँकेच्या निवडणुकीसाठी तीन पॅनल रिंगणात उतरणार असल्याने उमेदवारी अर्ज दाखल झाल्याच्या संख्येवरून लक्षात येत असले तरी, एकाही पॅनलने अद्याप आपल्या उमेदवारांची घोेषणा केलेली नाही. सर्वांचे लक्ष माघारीकडे लागले असून, मंगळवारी शेवटच्या दिवशी निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
ठळक मुद्देमर्चंट बॅँक : मंगळवारी उमेदवारांची घोषणा