उमराणे : अवर्षणप्रवणग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणार्या देवळा तालुक्याच्या पुर्व भागात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चार्याचाप्रश्न बिकट झाला असुन पशुधन सांभाळणे कठीण होऊन बसले आहे. शासनाने या भागात ठिकठिकाणी चारा छावण्या उभाराव्यात अशी मागणी शेतकर्यांकडुन केली जात आहे.चालुवर्षी तालुक्याच्या पुर्व भागात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाल्याने उमराणेसह परिसरातील सांगवी, कुंभार्डे, गिरणारे ,चिंचवे, तिसगाव, वर्हाळे, खारीपाडा,दिहवड आदी गावात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असतानाच जनावरांना चारा व पाणी उपलब्ध होत नसल्याने पशुधन सांभाळणे या भागातील शेतकर्यांना अवघड होऊन बसले आहे.पर्याय म्हणून जनावरांना उपाशीपोटी ठेवण्यापेक्षा शेताच्या बांधावरील लिंबाचा पाला तोडून टाकत खाऊ घालण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने वेळीच लक्ष देऊन पिण्याच्या पाण्यासह जनावरांना चारा उपलब्ध करु न द्यावा अशी मागणी या भागातील शेतकर्यांकडुन केली जात आहे.
देवळ्याच्या पूर्व भागात चारा टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2019 6:19 PM
अवर्षणप्रवणग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणार्या देवळा तालुक्याच्या पुर्व भागात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चार्याचा प्रश्न बिकट झाला असुन पशुधन सांभाळणे कठीण होऊन बसले आहे. शासनाने या भागात ठिकठिकाणी चारा छावण्या उभाराव्यात अशी मागणी शेतकर्यांकडुन केली जात आहे.
ठळक मुद्देगुरांना लिंबाच्या पाला : चारा छावण्या उभारण्याची मागणी