औदाणे : बागलाण तालुक्यातील ग्रामीण भागात दुष्काळी परिस्थिती व चारा टंचाई गुरांना भेडसावू लागली असुन उसाचे क्षेत्र ही घटले आहे त्यामुळे शेतकरी वदुग्ध उत्पादक ऊस बांडी खरेदी करून साठाकरीत आहेत.या वर्षी पाऊस अत्यल्प झाल्याने पिण्याच्या पाण्यासह गुरांना चारा टंचाई भासू लागली आहे दुग्धउत्पादनासाठी शेतकरी व्यावसायिक म्हशीसाठी हिरवीगार चारा म्हणून भांडी खरेदी करीत आहेत.शेतकरी ऊस तोड कामगारांकडून १०० मोळया पाचशे रूपये शेकडाने खरेदीकरत आहेत सायंकाळच्या सुमारास बांडी खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे.यासाठी शेतकरी व दुग्धउत्पादक शेतकरी हिरवागार चारा म्हणुन बांडी खरेदी करून साठा करत आहेत दुग्ध उत्पादक चाºयाअभावी अडचणीत आले आहेत.
बागलाण तालुक्यातील ग्रामीण भागात चारा टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 6:47 PM