खामखेडा : चालू वर्षी अल्पशा झालेल्या पावसामुळे पिण्याच्या पाण्याबरोबर चारा टंचाईच्या झळा शेतकऱ्याला जाणवू लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.गेल्या पाच-सहा वर्षांपासून पाऊसाचे प्रमाण घटत चालले आहे. प्रत्येक वर्षाला पावसाळा कमी कमी होताना दिसून येत आहे. त्यामुळे दिवसेदिवस दुष्काळात वाढ आहे. यापूर्वी सन १९७२ मघ्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाला होती. परंतु त्यावेळची परिस्थिती या वेळच्या परिस्थिती पेक्षा वेगळी होती. त्यावेळेस ओला दुष्काळ होता. पाणी भरपूर होते. जनावरांसाठी चारा होता.फक्त अन्न-धान्याचा तुटवडा निर्माण झाला होता. गेल्या वीस वर्षांपूर्वी जिरायती शेती मोठ्या प्रमाणात होती. अगदी बोटावर मोजण्या एवढया गावातील पाच दहा शेतकऱ्यांकडे बागायती शेती होती. त्यामुळे १९७२ च्या वेळेस पावसाळा एवढा प्रचंड प्रमाणात झाला होता की शेतातील पिके आली नव्हती. त्यामुळे अन्न धान्याचा तुटवडा निर्माण झाला होता. पाणी व जनावरांसाठी चारा मोबलक प्रमाणात उपलब्ध होता. फक्त लोकांना खाण्यासाठी अन्न धान्य नव्हते तेव्हा शासनाने लोकांसाठी रोजगारासाठी धरणे, नालाबांध आदी कामे उपलब्ध करून दिली होती. यामुळे लोकांना काही प्रमाणात धान्य व पैसा मिळत असे. परंतु यावर्षाच्या दुष्काळ त्यावेळेच्या दुष्काळापेक्षा भायनक आहे. असे जुन्या जाणकार माणसाकडून ऐकावयास मिळते.पूर्वी शेतात मोठे-मोठे बांध, नाला बांध होते. त्यामुळे पावसाळ्यात पाऊसाचे पडणारे पाणी या बांध, नालाबांध मघ्ये साचून राहत असे. ते पाणी जमिनीत मुरत असे. त्यामुळे विहिरींना पाणी मोबलक होते. तसेच शिवारात विहिरीचे प्रमाण कमी होते. त्यामुळे विहिरींना हि पाणी मोठ्या प्रमाणात होते.परंतु आता परिस्थिती अगदी उलट झालेली दिसून येत आहे. विज्ञान युगा मघ्ये शेती सपाट करण्यासाठी ट्रकटर, जेसीबी आदी यंत्र विकसीत झाल्याने जिरायती शेती बागायती केली. त्यामुळे विहिरींची संख्येत वाढ झाली. त्यामुळे भूगर्भातील पाणी साठा कमी झाला. तसेच ही जिरायती शेती बागायती करतांना जी जिरायती शेतीतील झाडी होती ती काढली गेली. परंतु त्या जागेवर नवीन झाडी लावली गेली नाहीत. शेतात जे मोठेमोठे नालाबांध होते ते ते जमीन सपाट झाल्याने पावसाळ्यात डोगरावर पडण्यार्या पावसाचे पाणी कोठेही न अडवता ते नदीला वाहुन जाते. त्यामुळे ते जमिनीत मुरत नसल्याने जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ होत नाही. झाडे कमी झाल्यामुळे पाऊसाचे प्रमाण कमी कमी होते आहे. चालू वर्षी सुरवातीपासून पाऊसाची वक्र दृटी होती. या अल्पशा पाऊसावर खिरपाची पिके आली. परंतु परतीचा व बेमोसमी पाऊस आला नाही. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळीत वाढ झाली नाही.दर वर्षी साधारण मे महिन्यापासून उन्हाळा जाणवत असे. परंतु या वर्षी मार्च मिहन्यापासून भीषण उन्हाळा जाणवू लागला आहे. आतापासून अनेक ठिकाणी पिण्याचा पाण्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. अनेक गावामघ्ये आठ-दिवसांनी पिण्याचा पाण्याचा मिळत आहे. तर काही ठिकानी महिलांना पाण्यासाठी डोक्यावर हंडे घेऊन पायपीट करावे लागत आहे. तसेच पिण्याचा पिण्याबरोबर जनावरांचा चाºयाचा तुटवडा निर्माण झाला आहे. दरवर्षी शेतकरी जानेवारी महिन्यात जनावरांसाठी मका किंवा ज्वारीची पेरणी चार्यासाठी करत असे.त्यामुळे हा चारा मे माहिन्यामघ्ये जनावरांना चाºयासाठी कापणीस येत असे. परंतु परतीचा पाऊस न पडल्यामुळे विहिरींना पाणी उतरले नाही. त्यामुळे जानेवारी महिन्यातचे विहिरींना तळ गाठण्यास सुरवात केल्याने जनावरांसाठी चारा करता आला नाही. तेव्हा शेतकºयाला आपली महागडी जनावरे कशी जतन कारावी हा प्रश्न आसापासून पडला आहे.
पाण्याबरोबर चारा टंचाईच्या झळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 10:46 PM
खामखेडा : चालू वर्षी अल्पशा झालेल्या पावसामुळे पिण्याच्या पाण्याबरोबर चारा टंचाईच्या झळा शेतकऱ्याला जाणवू लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
ठळक मुद्देभूगर्भातील पाण्याची पातळीत वाढ झाली नाही.