शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

चारा छावणी सुरू करावी

By admin | Published: September 06, 2015 10:25 PM

नारायणगाव : हवालदिल शेतकऱ्यांचे प्रशासनाला साकडे

मनमाड : नांदगाव तालुक्यात माळेगाव, नारायणगाव, घाडगेवाडी, वंजारवाडी, अनकवाडे, कऱ्ही, एकवई या गावांमध्ये गावठी गायी, म्हशींची संख्या मोठ्या प्रमाणात असून, शेतकरीवर्गाने दुबार पेरणी करूनही मका, बाजरीची पिके आली नसल्याने परिसरात चाराटंचाई निर्माण झाली आहे. पशुधन वाचवण्यासाठी नारायणगाव येथे चारा छावणी सुरू करावी, अशी मागणी मनमाड बाजार समितीचे माजी उपसभापती देवीदास उगले यांच्यासह शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, दुष्काळी परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना गहू, तांदूळ असे धान्य मिळाले पाहिजे. मरेगाअंतर्गत शेततळे, माती बांध, विहिरी, नवीन खोदकाम अशा स्वरूपाची कामे त्वरित हाती घ्यावी. नदी, नाल्यांवर मातीनाला बांध, सीमेंट बंधारे अशी कामे सुरू केल्यास मजुरांना कामे मिळतील व त्यांची उपासमार होणार नाही. जलशिवार योजनेअंतर्गत डोंगराळ भागामध्ये समतल चारी व पूर्वीचे तुटलेले माती बंधारे, नाला बांध अशी कामे सुरू करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. (वार्ताहर) गेल्या ५० वर्षांत नव्हता असा दुष्काळ यावर्षी जाणवत आहे. पशुधन वाचले नाही तर शेतकरी जगणार कसा याची नोंद घ्यावी. वनविभागाने वन्यजीवांसाठी नारायणगाव, माळेगाव येथे पिण्याच्या पाण्यासाठी पाणवठे बांधावे व त्यांचे रक्षण करावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.