ठळक मुद्दे आलं, पालक, कोथिंबीर, बटाटा, गवार,शेपू, डांगर, चक्की, भेंडी, गिलके, दोडके यांची लागवड
येवला : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचमळा येथे दप्तरमुक्त शनिवार उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी परसबाग फुलविली आहे.शिक्षक प्रियांका ससे यांच्या विचारप्रेरणेतून आणि मुख्याध्यापक सुनील माने यांच्या सहकार्याने प्रथम वाफे तयार करून त्यामध्ये कांद्याची रोपे लावण्यात आली. यानंतर लसूण लागवड केली. त्याचप्रमाणे आलं, पालक, कोथिंबीर, बटाटा, गवार,शेपू, डांगर, चक्की, भेंडी, गिलके, दोडके यांची लागवडही केली. परसबाग तयार करण्यासाठी सचिन शेळके यांचे सहकार्य लाभले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वाल्मीक शेळके यांनीवाफे बनविले. ज्येष्ठ नागरिक फकिरा शेळके यांनी बी रोपणक्रि येची माहिती दिली.