देवळा : देवळा एज्युकेशन सोसायटी संचलित जिजामाता कन्या विद्यालयात क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला.अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव गंगाधर सिरसाठ होते. सेवानिवृत्त आदिवासी विकास आयुक्त त्र्यंबक बागुल, गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार आदी उपस्थित होते. विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी आदिवासी गीत व क्र ांती गीत सादर केले. आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच स्वातंत्र्य चळवळीतील ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांना यावेळी अभिवादन करण्यात आले. सूत्रसंचालन सुनील पवार यांनी केले. एस. बी. पानसरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास विद्यालयाच्या मुख्याध्यापक उषा बच्छाव, केंद्रप्रमुख मोरे, पर्यवेक्षक प्रतिभा सागर आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्र माचे नियोजन सांस्कृतिक विभागप्रमुख जे. टी. बत्तीसे यांनी केले. खेडगाव : येथील मविप्र समाज संचलित श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात आदिवासी गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापक श्रीमती के. पी. गांगुर्डे यांनी क्र ांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन केले. उपमुख्याध्यापक आर. डी. गायकवाड, साक्षी भालेराव, झिनत मणियार यांनी बिरसा मुंडा यांच्या आदिवासी उत्थानासाठी केलेल्या कार्याबद्दल माहिती सांगितली. सानिका बागुल हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. वर्गशिक्षक आर. जे. सूर्यवंशी यांनी माहिती संकलन केले. यावेळी ज्येष्ठ शिक्षक व्ही. आर. आहेर, बी. एम. वाघ, श्रीमती के. एन. काळे व सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. इगतपुरी : जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त इगतपुरी येथे राजकमल सभागृहात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी कवी तुकाराम धांडे होते. महाराष्ट्र राज्य आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटना, हिंदू महादेव कोळी संघटना इगतपुरी व सह्याद्री आदिवासी मठाकुर संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मोटारसायकल रॅली काढण्यात आली. तालुक्यातून आलेल्या आदिवासी बांधवांनी चिंचलेखैरे, कथ्रूनगण, तळेगाव, शेंगाळवाडी ते इगतपुरी शहरातून तीनलकडी येथील राजकमल हॉलपर्यंत मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यावेळी आदिवासी महिला नृत्य, दीपनृत्य सादर करण्यात आले.सूत्रसंचालन अंकुश तळपे, आदिवासी शिक्षक संघटनेचे निवृत्ती तळपाडे यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी शिक्षक संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष मोतीराम पवार, महादेव कोळी संघटनेचे इगतपुरी शहराध्यक्ष सुरेश भांगरे, विकास शेंगाळ, संपर्कप्रमुख संजय वारघडे, आदिवासी विकास आघाडीचे नितीन उंबरे, आदिवासी शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष उत्तम भवारी, नगरसेवक संगीता वारघडे, अनिल गभाले, नामदेव लोहरे, कैलास जाखेरे, चिंचलखैरेचे उपसरपंच निवृत्ती खोडके, मंगाजी खडके, इगतपुरी पतसंस्थेचे अध्यक्ष तुकाराम सारूक्ते, हरिश्चंद्र भोये, हिरामण चव्हाण, शिरीष पाडवी, आदी आदिवासी बांधव उपस्थित होते. आदिवासी बांधवांसाठी माजी सैनिक रमेश वारघडे, सुरेश भांगरे यांनी स्वखर्चाने भोजनव्यवस्था केली. राजू थवील यांनी याप्रसंगी विविध स्पर्धेत यश मिळविणारे प्रवीण साबळे, अभिजित सारूक्ते, साधना भांगरे, संस्कृती कडाळे यांचा कवी तुकाराम धांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आभार जनार्दन करवंदे यांनी मानले.
आदिवासी दिनानिमित्त लोकनृत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 12:15 AM