सातपूर : नाशिकमधील डिफेन्स इनोव्हेशन हब प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन खासदार हेमंत गोडसे यांनी दिले.निमाच्या विविध उपक्रममांची आणि नाशिकमध्ये होणार असलेल्या डिफेन्स इनोव्हेशन हब स्थापनेच्याप्रक्रियेत निमातर्फे होत असलेल्या प्रयत्नांची माहिती गोडसे यांनी रविवारी (दि.३०) घेतली. यावेळी निमाच्या वतीने खासदार गोडसे यांचा सत्कार करण्यात आला. निमातर्फे डिफेन्स इनोव्हेशन हबसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आला असून, संबंधित प्रक्रियेबाबत सहकार्य करण्याची अपेक्षा निमाच्या वतीने करण्यात आली. डिफेन्स इनोव्हेशन हब प्रकल्प नाशिकच्या औद्योगिक वाटचालीत मैलाचा दगड ठरणार असून स्थानिक उद्योगांना व्यवसायवाढीच्या संधी यादृष्टीने महत्त्वाचा ठरणार असल्याने नक्कीच सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही गोडसे यांनी यावेळी दिली. निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, सरचिटणीस तुषार चव्हाण, उपाध्यक्ष शशिकांत जाधव, सचिव सुधाकर देशमुख, खजिनदार कैलास आहेर, प्रदीप पेशकार मंगेश पाटणकर, संजय सोनवणे, मनीष रावल, संजय महाजन, नीलिमा पाटील आदींनी चर्चेत सहभाग घेतला.
डिफेन्स इनोव्हेशन हब पूर्णत्वासाठी पाठपुरावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 12:23 AM