शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी पाठपुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 2:14 AM

शेतकऱ्यांच्या कांद्याची खरेदी करणाºया व्यापाऱ्यांना साठवणूक करण्याची क्षमता वाढवून देण्यात यावी व कांद्याचे सध्या कोसळत असलेले दर पाहता केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लादलेली बंदी उठवावी यासाठी आपण येत्या दिवसांत दिल्लीत संबंधितांची भेट घेणार असल्याची माहिती माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिली.

ठळक मुद्देशरद पवार : बळीराजासाठी कर्जमाफीची व्याप्ती वाढविण्याचीही तयारी

नाशिक : शेतकऱ्यांच्या कांद्याची खरेदी करणाºया व्यापाऱ्यांना साठवणूक करण्याची क्षमता वाढवून देण्यात यावी व कांद्याचे सध्या कोसळत असलेले दर पाहता केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लादलेली बंदी उठवावी यासाठी आपण येत्या दिवसांत दिल्लीत संबंधितांची भेट घेणार असल्याची माहिती माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिली. तोटा सहन करणाºया शेतकºयांना दोन पैसे जादाचे मिळत असतील तर असे निर्णय मागे घेणेच योग्य असते अशी पृष्टीही त्यांनी जोडली.शुक्रवारी शरद पवारनाशिक जिल्ह्णाच्या दौºयावर आले असता त्यांनी संवाद साधला. (पान ५ वर)शेतकºयांना सरसकट कर्जमाफीमिळालेली नसल्याच्या प्रश्नावरबोलताना पवार म्हणाले, सध्या राज्य सरकारने राज्यातील शेतकºयांचे दोन लाख रुपये कर्जमाफ केले आहे. त्याची संख्या एकूण कर्जदार शेतकºयांच्या जवळपास ८५ टक्के इतकी आहे. त्यामुळे ज्या शेतकºयांना त्याचा फायदा झाला नाही त्यांची संख्या १५ टक्के इतकी आहे. ती संख्या त्यामानाने कमी आहे. परंतु अशा शेतकºयांनाही कर्जमाफीचा कसा लाभ देता येईल, त्याचबरोबर नियमित कर्ज परतफेड करणाºया शेतकºयांनादेखील कसा मोठा दिलासा देता येईल याचा निर्णयही घेतला जाईल. परंतु त्यासाठी मार्चमध्ये अर्थसंकल्पात तरतूद करावी लागेल. त्याबाबत सरकारमधील लोक निर्णय घेतील, असेही पवार यांनी सांगितले. राज्यात अवकाळी पावसामुळे फळबागांचे प्रचंड नुकसान झाले, त्यासाठी शेतकºयांना ३५ हजारांपर्यंतची मदत देण्यात आली आहे, ती अपुरी असल्याचे मान्य आहे. परंतु फळबागा लागवडीचा व त्यांना मदतीचा प्रश्न केंद्राच्या अखत्यारित येत असल्यामुळे त्या संदर्भातही आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू, असेही ते म्हणाले.नारायण राणे यांनी महाविकास आघाडीच्या सरकार काम करीत नसल्याची टीका केल्याच्या प्रश्नावर पवार म्हणाले, सध्या राज्याचे मंत्री बारा ते पंधरा तास काम करीत असून, ते घरी येत नसल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्याकडे करण्यास सुरुवात केल्याचे मिश्किलपणे सांगून पवार यांनी, गेली पाच, सहा वर्षे राज्यात जनतेची कामे झाली नसल्यामुळे जनता आता आपल्या कामांसाठी मंत्र्यांकडे गर्दी करीत आहे, त्यामुळे मंत्रालयाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाल्याचे चित्र दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावा मागण्याच्या प्रश्नावरून निर्माण झालेल्या वादात आपल्याला पडायचे नाही अशा शब्दात पवार यांनी स्वत:ला त्यापासून दूर ठेवले. मात्र स्व. इंदिरा गांधी यांच्याबाबत संजय राऊत यांनी स्टेटमेंट करायला नको होते, अशी आमची सर्वांची भावना होती. परंतु राऊत यांनी स्वत:च त्यांचे वक्तव्य मागे घेतल्याने हा प्रश्न आता चर्चेचा राहिला नसल्याचे पवार यांनी सांगितले.माझ्या शेजारीपण हाजी मस्तान !करीम लाला-इंदिरा गांधी भेटीवरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन सरकारचे गुन्हेगारांशी संबंध असल्याच्या आरोपावर बोलताना शरद पवार यांनी, राजकीय व्यक्ती वा मंत्र्यांना भेटायला येणाºया प्रत्येक व्यक्तीविषयी माहिती असतेच असे नसते. माझ्याबाबतीतही असाच प्रकार घडला होता. १९७२ मध्ये मुंबईत महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाची सभा होती. सभा आटोपली व दुसºया दिवशी वृत्तपत्रात बातमी आली ‘शरद पवार यांच्याशेजारी हाजी मस्तान बसले’ आता राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर शेजारी कोण बसले आहे हे माहिती नसते व एखाद्या व्यक्तीला व्यासपीठावरून उठून जा, असे सांगता येत नसते असे सांगून पवार यांनी या संदर्भातील चर्चा निरर्थक असल्याचे पटवून दिले.

टॅग्स :NashikनाशिकSharad Pawarशरद पवारonionकांदा