दाभाडी - प्रत्येक नागरिकाने वाहतूक नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. रस्त्यावरील वाढत्या अपघातांना आपणच जबाबदार असतो. आपली सुरक्षितता आपण ठेवावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते संजय फतनानी यांनी केले. राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा सप्ताहांतर्गत आई प्रतिष्ठान व शहर वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने मुंगसे उपबाजार आवारात शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर व ट्रेलरला रिफ्लेक्टर लावण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र दिघे, सल्लागार सतीश मांडवडे, कार्याध्यक्ष प्रवीण शिंदे, समीर मराठे, प्रोजेक्ट चेअरमन उमेश पवार, संदीप पठाडे, वाहतूक पोलीस अधिकारी दिनेश जाधव, ज्ञानेश्वर नवरे, राजेंद्र गोसावी, मोहन आहेर, ओंकार शेरे उपस्थित होते. फतनानी म्हणाले, अपघात रोखण्यासाठी शिस्त महत्त्वाची आहे. रात्रीच्यावेळी महामार्गावर दुचाकी चालवू नये, हेल्मेट वापरण्याची गरज आहे. यावेळी प्रवीण शिंदे व पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर नेवरे यांनी वाहतूक नियम व त्यासंबंधीची माहिती दिली. यावेळी विनोद जाधव, अनिल शेलार आदींसह शेतकरी उपस्थित होते.
रस्ता वाहतूक नियमांचे पालन करा : फतनानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 4:19 AM