याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ, उपप्राचार्य डॉ. डी. एम. जाधव, उपप्राचार्य प्रा. आर. व्ही. पवार आदी उपस्थित होते.
यावेळी आढाव म्हणाले की, रस्ता माणसाशी बोलत असतो. त्या रस्त्याची भाषा समजून घ्या. आपली घरी कुणीतरी वाट पाहत आहे याची प्रत्येकाने जाणीव ठेवली तर अपघात होणार नाहीत. वाहतुकीचे नियम पाळा आणि आपले जीवन सुरक्षित ठेवा, असे आवाहनही त्यांनी केले. प्राचार्य रसाळ यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रा. एस. बी. कर्डक यांनी तर परिचय आर. टी. सोनवणे यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. योगेश भारस्कर यांनी तर आभार डॉ. सुरेखा जाधव यांनी मानले. यावेळी कार्यक्रमास शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
===Photopath===
150221\15nsk_29_15022021_13.jpg
===Caption===
सिन्नर महाविद्यालयात रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना वाहतूक पोलीस निरीक्षक व्ही. आर. आढाव. समवेत पी. व्ही. रसाळ, डी. एम. जाधव, आर. व्ही. पवार, एस. बी. कर्डक, आर. टी. सोनवणे आदी.