नाशिक : कोरोनासारख्या जीवघेण्या आजारातून वाचवण्यासाठी देण्यात येणारे स्टुरॉईडस आणि अन्य टोसिलिझुमॅब इंजेक्शनचे आता प्रतिकूल परिणाम दिसत असून, म्युकॉर्मायकॉसीस हा बुरशी सारखा आजार होत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. विशेषत: मधुमेह असलेल्या रुग्णांना तो हाेत असून, त्यामुळे अनेकांचे डोळे गमविण्याची वेळ आली आहे. महापालिकेच्या वतीने त्यास दुजोरा देण्यात आला आहे. अनेक खासगी रुग्णालयात यासंदर्भात रुग्ण दाखल होत असल्याचेदेखील सांगण्यात आले. केवळ डोळेच नव्हे, तर मुत्रपिंड आणि मेंदूवरही आघात होऊ शकतो. नाशिकमध्ये फेब्रुवारीपासून कोरोनाचा संसर्ग वाढण्यास सुरुवात झाली. दुसरी लाट इतकी भयंकर आहे की अनेक रुग्णांना ऑक्सिजनचीदेखील गरज भासत आहे. कोरोना रुग्णांची गंभीर अवस्था असेल तर त्यांना वाचविण्यासाठी उपचार करणारे डॉक्टर्स स्टुरॉईडस आणि अन्य टोसीलीझुमॅब इंजेक्शनचा वापर करतात. त्यानंतर हे रुग्ण बरे होत असले तरी नंतर मात्र, अशा औषधांच्या माऱ्यांचा प्रतिकूल परिणामदेखील जाणवत आहे. विशेषत: औषधांच्या माऱ्यामुळे म्युकॉर्मायकॉसीस हा बुरशीजन्य आजार होतो. विशेषत: मधुमेह असणाऱ्या रुग्णांवर अशा औषधांच्या डोसचा विपरित परिणाम जाणवत आहे. अनेकांची डोळे, जबडा अशा ठिकाणी बुरशी जन्य आजार होत आहे. या बुरशीचा आघात होत असल्याने डोळे निकामी हाेतात आणि ते काढावेदेखील लागत आहेत. तसेच मुत्रपिंड आणि मेंदूवरदेखील या आजाराचा आघात होऊ शकतो, असे नाशिकमधील जाणकार वैद्यकीय व्यावसायिकांनी सांगितले.साधारणत: उपचाराचे हेवी डोस घेण्यामुळे प्रतिकारशक्ती नाक कोरडे होणे, गाल सुजणे, डोळे लाल होणे किंवा डोळे दुखणे ही या विकारांची मुख्य लक्षणे आहेत. दिल्लीत या आजाराचे रुग्ण वाढत असून, आरोग्य मंत्रालयानेदेखील चिंता व्यक्त करीत सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
कोरोना पाठोपाठ आता म्युकॉर्मायकॉसीसचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2021 1:46 AM
कोरोनासारख्या जीवघेण्या आजारातून वाचवण्यासाठी देण्यात येणारे स्टुरॉईडस आणि अन्य टोसिलिझुमॅब इंजेक्शनचे आता प्रतिकूल परिणाम दिसत असून, म्युकॉर्मायकॉसीस हा बुरशी सारखा आजार होत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. विशेषत: मधुमेह असलेल्या रुग्णांना तो हाेत असून, त्यामुळे अनेकांचे डोळे गमविण्याची वेळ आली आहे. महापालिकेच्या वतीने त्यास दुजोरा देण्यात आला आहे. अनेक खासगी रुग्णालयात यासंदर्भात रुग्ण दाखल होत असल्याचेदेखील सांगण्यात आले. केवळ डोळेच नव्हे, तर मुत्रपिंड आणि मेंदूवरही आघात होऊ शकतो.
ठळक मुद्देबुरशीजन्य आजार : शहरात खासगी रुग्णालयात अनेक रुग्ण दाखल