सिन्नर : खासगी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या शाळेत मिळणारे शिक्षण गुणवत्तापूर्ण आहे. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून देतानाच डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर शिक्षकांनी करावा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी केले. घोटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनात पारितोषिक वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. सरपंच कल्पना खामकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमासाठी आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, रणजित आंधळे, हौशीराम घोटेकर, संदीप वैराळ, सुधाकर निकम, कुसुम निकुंभ आदी व्यासपीठावर उपस्थित होते.ग्रामीण भागातील शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावर नियोजन करण्यात येत आहे. शाळांच्या विकासासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगत सांगळे यांनी घोटेवाडीसारख्या लहान गावात विद्यार्थ्यांना मिळणाºया सुविधांचे कौतुक केले. यावेळी आयोजित सांस्कृतिक महोत्सवात विद्यार्थ्यांनी धमाल केली. संतोष झावरे, शिक्षक पोपट नागरगोजे, सोनाली शिंदे, सुरेखा शेळके यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी विकास सोनवणे, विद्याधर घेगडमल, विनायक शिंदे यांनी कोरियोग्राफी केली. माजी सरपंच गोरक्षनाथ घोटेकर, दत्ता ढमाले, कृष्णा घोटेकर, बापू घोटेकर, राजू घेगडमल, विलास पठाडे, जितेंद्र घोटेकर आदी यावेळी उपस्थित होते.
घोटेवाडी शाळेत स्नेहसंमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 11:12 PM