विंचूर : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर विंचूर परीसरात आश्रयास असलेल्या निर्वासित व निराधार कुटुंबांना येथील बजरंग मंडळ, विंचूर पोलीस कर्मचारी, तलाठी व पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने अन्नदान वाटपाचे आयोजन करण्यात आले.संपूर्ण विश्वात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाच्या महामारीने आपल्या देशासह महाराष्ट्र राज्यात जोमाने हात पाय पसरवायला सुरु वात केली आहे. त्यामुळे सरकारला लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागला. परीणामी गावोगाव फिरून, मोलमजुरी करून आपले पोट भरण्याºया मजूरांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशाच प्रकारच्या निराधार व निर्वासितांची येथे पंचवीस ते तीस कुटुंबे आहेत. या निराधार कुटुंबीयांच्या पोटापाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने त्यांची दोन्ही वेळ भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. गेल्या एक तारखे पासून सुरु असलेला हा उपक्र म लॉकडाऊनचा कालावधी संपेपर्यंत राबविण्यात येणार आहे.सदर उपक्र माच्या यशस्वीतेसाठी बजरंग मंडळाचे देवीसिंग परदेशी, किरण नवले, संजय जंगम,आनंदा नागमोते, रौफ शेख, जगन व्यवहारे, संजय साळी, नंदू वाडेकर, संतोष सोनवणे, राजेंद्र क्षीरसागर, दादा काद्री, किशोर पाटील, नितीन गायकवाड, जगन्नाथ जोशी, संदीप शिरसाट, दिपक घायाळ, भाऊसाहेब हुजबंद, तलाठी सागर शिर्के पोलीस कर्मचारी दिपक लाड, राजेश घुगे, योगेश शिंदे, कैलास मानकर आदी प्रयत्नशील आहेत.
विंचूरला निर्वासित निराधारांना अन्नदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2020 5:52 PM
विंचूर : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर विंचूर परीसरात आश्रयास असलेल्या निर्वासित व निराधार कुटुंबांना येथील बजरंग मंडळ, विंचूर पोलीस कर्मचारी, तलाठी व पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने अन्नदान वाटपाचे आयोजन करण्यात आले.
ठळक मुद्दे हा उपक्र म लॉकडाऊनचा कालावधी संपेपर्यंत राबविण्यात येणार