लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव : सध्या लॉकडाउनमुळे हॉटेल्स, खानावळी बंद असल्याने निराधार, बेवारस, भिकारी यांचे हाल होत आहेत. त्यांना अन्न मिळविण्यासाठी कोणताच पर्याय उरलेला नाही. परिणामी त्यांची उपासमार होत असल्याचे निदर्शनास आल्याने युवा फाउण्डेशनचे कार्यकर्ते सुमित सोनवणे व सहकाऱ्यांनी दररोज सकाळ व सायंकाळ जेवणाचे पॅकेट बनवून शहरातील गरीब व भुकेल्या व्यक्तींना पुरविण्याचा उपक्र म हाती घेतला आहे. सकाळच्या जेवणासाठी खिचडी व रात्रीच्या जेवणासाठी पिठलं-भात पुरवला जात आहे.कोरोनाच्या निमित्ताने माणुसकी हरविल्याची उदाहरणे समोर येत असतांना ती जिवंत असल्याचाही अनुभव येत आहे. जीवनावश्यक व खाद्य पदार्थ वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली असतांना भाव वाढवून नफा कमावण्याची प्रवृत्ती डोकं वर काढते तशी उद्याचे उद्या बघू.... आज शिल्लक आहे ते सगळे देऊन टाकू लोकांची गरज भागवू असा विचार करणारेही आहेत. या पार्श्वभूमीवर घरातून दैनंदिन गरजांसाठी बाहेर पडणाºया सामान्यांना समजावून घेत कर्तव्य बजावणारे पोलीस आहेत. मात्र साºया अवघडलेल्या स्थितीत कार्यकर्त्यांना विदारक आणि मन सुन्न करणारेही अनुभव येत आहेत. एका युवा कार्यकर्त्याला आलेला अनुभव डोळे उघडणारा आहे. जेवण वितरित करतांना त्यांना जराजर्जर झालेल्या आजीभेटल्या. त्यांना सध्याच्या परिस्थितीची जाणीव झाली आहे परंतु, अशावेळी कुणाकडे हात पसरणार, असा प्रश्न त्यांनाही भेडसावला. त्यांना कार्यकर्त्यांनी फरसाण दिले आणि त्यांची भूक भागविली तेव्हा त्यांच्या चेहºयावरचे समाधान पाहून युवा कार्यकर्तेही गहिवरले. या अन्नय ज्ञात कुणाल खरोटे, सुमित गायकवाड हेदेखील सहभागी झाले आहेत.
भुकेलेल्यांना अन्नदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 9:11 PM
नांदगाव : सध्या लॉकडाउनमुळे हॉटेल्स, खानावळी बंद असल्याने निराधार, बेवारस, भिकारी यांचे हाल होत आहेत. त्यांना अन्न मिळविण्यासाठी कोणताच पर्याय उरलेला नाही. परिणामी त्यांची उपासमार होत असल्याचे निदर्शनास आल्याने युवा फाउण्डेशनचे कार्यकर्ते सुमित सोनवणे व सहकाऱ्यांनी दररोज सकाळ व सायंकाळ जेवणाचे पॅकेट बनवून शहरातील गरीब व भुकेल्या व्यक्तींना पुरविण्याचा उपक्र म हाती घेतला आहे. सकाळच्या जेवणासाठी खिचडी व रात्रीच्या जेवणासाठी पिठलं-भात पुरवला जात आहे.
ठळक मुद्देयुवा फाउण्डेशन सरसावले