नाशिक : घरात कर्ता पुरुष नाही, अज्ञान अडाणीपणाबरोबरच घरात अठरा विश्व दारिद्र्य, रस्त्यावर पडलेले कागद काच वेचणे आणि भंगार-वाल्यांना विकल्यानंतर पदरी पडणारे दोन पैसे हेच साधन. मात्र सध्या शहरात संचारबंदी झाली. कचरा वेचायला जाता येत नाही आणि गेले तर कचराच साफ ! अशा बिकट परिस्थतीत चार दिवस घरात चूल पेटली नाही. जठराग्नी फडकल्यानंतर हातपाय मारायला सुरुवात केली. तेव्हा कुठे समाजातील काही दाते धावून आले. त्यांनी धान्य दिले आणि घरात कशा तरी चुली पेटल्या.नाशिक शहरातील सुमारे दीडशे महिलांच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. कागद काच वेचणे आणि अप्रत्यक्षरीत्या शहराच्या स्वच्छतेला हातभार लावणाºया अनेक गरीब महिलांपैकी या देखील आहेत. परंतु या महिलांची स्थिती इतरांपेक्षा वेगळी. त्या विधवा किंवा परितक्तया आहेत. निलगीरी बाग, आम्रपाली झोपडपट्टी, भीमवाडी येथे वास्तव्याला असलेल्या महिलांवर संचारबंदीमुळे संक्रांत आली आहे. बाहेर पडायचे नाही तर मग खायचे काय? त्यामुळे पोटासाठी काही तरी करण्यासाठी त्यांनी सेवा केंद्राच्या अॅड. राजपाल शिंदे यांना साकडे घातले. त्यांनी सोशल मिडीयावरून आवाहन केल्याने मदतीचा ओघ सुरु झाला.दरम्यान, वंचित बहुजन आघाडीतर्फेही नाशिकरोड, शिखरेवाडी परिसरातील झोपडपट्टी-वासीयांना खाद्य पाकिट पुरविण्यात आले. तर जैन संघटना जितोतर्फेही विविध भागात शिधापुरवठा व अन्नाची पाकिटे वितरित करण्यात आली.सोशल मीडियावर केलेल्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला आणि सामाजिक जाणिवेतून काही दाते उभे राहीले. लोकविकास संस्थेचे मिलिंंद व सुजाता बाबर, अमृता गंगाकीरकर अशा अनेकांनी माणुसकी जपली. शक्य तेवढे धान्य दिले. आणि या घरातील महिलांची चूल पेटली.
दाते धावून आल्याने मुखी पडले अन्न!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 12:19 AM
घरात कर्ता पुरुष नाही, अज्ञान अडाणीपणाबरोबरच घरात अठरा विश्व दारिद्र्य, रस्त्यावर पडलेले कागद काच वेचणे आणि भंगार-वाल्यांना विकल्यानंतर पदरी पडणारे दोन पैसे हेच साधन. मात्र सध्या शहरात संचारबंदी झाली. कचरा वेचायला जाता येत नाही आणि गेले तर कचराच साफ ! अशा बिकट परिस्थतीत चार दिवस घरात चूल पेटली नाही. जठराग्नी फडकल्यानंतर हातपाय मारायला सुरुवात केली. तेव्हा कुठे समाजातील काही दाते धावून आले. त्यांनी धान्य दिले आणि घरात कशा तरी चुली पेटल्या.
ठळक मुद्देकष्टकऱ्यांची उपासमार : सामाजिक बांधीलकीने मिळाली साथ