नाशिक : फुटपाथ ही केवळ पादचारी सोडून अन्य घटकांची मक्तेदारी नाही. योग्य नियोजन केले तर विविध रस्त्यांच्या लगत असलेल्या अशा प्रकारच्या फुटपाथवर पादचाºयांना अडथळा न आणताही मोटारींची पार्किंग करता येते, तसेच झाडांभोवतीदेखील कल्पकतेने आळे करून अथवा पार करून कट्टाही तयार करता येऊ शकतो. बंगळुरू आणि पुण्यात अशाप्रकारच्या अनेक मार्गांवर प्रयोग करण्यात आले असून, ते उपयुक्त ठरले आहेत. नाशिकमध्येदेखील अशाप्रकारच्या आदर्श फुटपाथचा प्रयोग करण्याची तयारी सुरू असून, त्यादृष्टीने महापालिकेने आयटीडीपी या स्वयंसेवी संस्थेची मदत घेतली आहे.वाहतूक नियोजन म्हटले की, सर्व प्रथम नागरिक केंद्रस्थानी ठेवण्याची गरज आहे. परंतु हे टाळूनच अन्य खासगी वाहतुकीच्या पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित केले जाते. त्यामुळे फुटपाथ हे नावालाच उरतात. नाशिकमध्येदेखील फुटपाथवर पादचाºयांव्यतिरिक्त अन्य घटकांचा ताबा असल्याने नागरिकांना त्याचा वापर करता येत नाही. परंतु बंगळुरू आणि पुण्याच्या धर्तीवर नाशिक महापालिकाही कॉलेजरोडवर अशाप्रकारचा प्रयोग राबविण्याची तयारी करीत आहे. बंगळुरूमधील सेंट मार्क्स स्ट्रीट या रस्त्यावर तेथील महापालिकेने फुटपाथ बांधला आहे. भर बाजारपेठेतील हा भाग अत्यंत वर्दळीचा आहे. फुटपाथ तयार केल्यानंतर एकही पादचारी मुख्य रस्त्यावरून चालता कामा नये, असे उद्दिष्ट या महापालिकेने ठेवले होते. त्यानुसार या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या फुटपाथचा अभ्यास केला तर जेवढा काळा भाग आहे, तो वाहनांना आणि उर्वरित राखाडी भाग पादचारी आणि अन्य साधनांसाठी असे नियोजन करण्यात आले होते. त्याचा अनुरूप वापर होताना दिसत असल्याचे अभ्यासक सांगतात. बंगळुरूच नव्हे महाराष्टत पुण्यातही अशा पद्धतीचे सर्वांना उपयुक्त ठरतील अशा पद्धतीचे फुटपाथ औंध भागात करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे रस्त्याच्या कडेला असलेली झाडे तोडण्याचा प्रश्न पर्यावरणप्रेमींच्या विरोधामुळे ऐरणीवर येत असताना दुसरीकडे मात्र झाडांना वाचवूनही फुटपाथ तयार केले जाऊ शकतात आणि त्यामुळेच वृक्षांचे जतन होते, परंतु झाडाच्या पारावर एखादा कट्टा तयार होऊ शकतो अशाप्रकारचे पुण्यातील प्रयोगात दिसून येते. (समाप्त)
पादचाºयांची सोय : नाशिकमध्येही कॉलेजरोडवर प्रायोगिक तत्त्वावर फुटपाथ बंगळुरू, पुण्यातील प्रयोग नाशिकमध्येही शक्य !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 12:36 AM
फुटपाथ ही केवळ पादचारी सोडून अन्य घटकांची मक्तेदारी नाही. योग्य नियोजन केले तर विविध रस्त्यांच्या लगत असलेल्या अशा प्रकारच्या फुटपाथवर पादचाºयांना अडथळा न आणताही मोटारींची पार्किंग करता येते
ठळक मुद्देबंगळुरू आणि पुण्यात अशाप्रकारच्या अनेक मार्गांवर प्रयोग आयटीडीपी या स्वयंसेवी संस्थेची मदत भर बाजारपेठेतील भाग अत्यंत वर्दळीचा