ईडीने पाठविलेल्या नोटिसीवर बोलताना संजय राऊत यांनी, ईडीची नोटीस म्हणजे सरकारी कागद असून, कितीही नोटिसा येऊ द्या, आपल्यावर त्याचा परिणाम होत नाही. मात्र, महाराष्ट्रातही आमचे सरकार आहे हे विसरू नये, असा इशारा देऊन आम्ही तलवार उपसली, तर पळता भुई होईल, हे ध्यानात घ्यावे, अशी अप्रत्यक्ष धमकी भाजपला दिली. गिरीश महाजन यांच्यावर सुडाने कारवाई होऊ नये, या मताचे आपण आहोत, परंतु प्रताप सरनाईक, मी आम्हाला तर दहा ते पंधरा वर्षांचे जुने प्रकरण उकरून नोटीस पाठविली जात आ,हे हे त्यांनी विसरू नये. मात्र, राजकारणात दोन घ्यावे लागते दोन द्याव्याही लागतात, असा सूचक इशाराही त्यांनी दिला. आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढेल, असे सांगताना ग्रामपंचायत निवडणूक व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत इच्छुक कार्यकर्त्यांची संख्या अधिक असते, अशा वेळी त्यांना सामावून घ्यायचे असते, परंतु महाविकास आघाडीने एकत्र लढावे, असा आपला प्रयत्न राहील, असेही शेवटी संजय राऊत म्हणाले. यावेळी माजी आमदार व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गीते, सुनील बागुल यांनी खासदार राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
घटनात्मक व्यक्तींकडूनच घटनेची पायमल्ली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2021 4:12 AM