शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
3
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
4
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
5
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
6
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
7
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
8
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले
9
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
10
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
11
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
12
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
13
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
14
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
15
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
16
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
17
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
18
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
19
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
20
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन

गरोदर मातांना ‘आधार’ची सक्ती : अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:22 AM

नाशिक : गरोदर व स्तनदा मातांना शासनाच्या आरोग्यविषयक योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण विकास विभागाने आधारची सक्ती केली असून, त्यामुळे कुपोषण व बालमृत्यूचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त करीत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या महिला आघाडीने अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सक्ती मागे घेण्याची विनंती केली आहे.  यासंदर्भात अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले ...

नाशिक : गरोदर व स्तनदा मातांना शासनाच्या आरोग्यविषयक योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण विकास विभागाने आधारची सक्ती केली असून, त्यामुळे कुपोषण व बालमृत्यूचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त करीत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या महिला आघाडीने अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सक्ती मागे घेण्याची विनंती केली आहे.  यासंदर्भात अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्याच्या ग्रामविकास व महिला बालकल्याण विभागाने १ एप्रिलपासून महिलांना आधार कार्डशिवाय सबला आणि अमृत आहार योजनेचा लाभ मिळू शकणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे अनेक बालकांना आणि स्तनदा मातांना, गरोदर महिलांना या मूलभूत सुविधांपासून वंचित रहावे लागणार आहे. विशेषत: बेघर, स्थलांतरित आणि रहिवासी पुरावा नसलेल्या गरीब कुटुंबांना याचा सर्वात मोठा फटका बसणार आहे. हे अन्नसुरक्षा कायद्याचे सरळसरळ उल्लंघन असून, मूलभूत मानवी हक्काची पायमल्ली आहे.  राज्यात वर्षाच्या कालावधीत २४,२०० बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे. जो अतिशय चिंताजनक आहे. त्यामुळे शासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी विनंतीही या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी राष्टवादी महिला काँग्रेस शहराध्यक्षा अनिता भामरे, कार्याध्यक्षा सुषमा पगारे, सलमा शेख, रंजना गांगुर्डे, शाहिन शेख, निमा जवादे, शकिला शेख, संगीता गांगुर्डे, कामिनी वाघ आदी उपस्थित होत्या.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयNCPराष्ट्रवादी काँग्रेस