शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
6
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
7
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
8
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
9
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
10
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
11
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
12
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
13
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
14
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
17
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
18
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
19
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
20
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन

देवळा तालुक्यात हेल्मेट, शिट बेल्ट सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 6:01 PM

देवळा : देवळा शहर व तालुक्यात एक फेब्रवारीपासून विना हेल्मेट दुचाकीस्वार व सिटबेल्टचा वापर न करणाऱ्या चारचाकी वाहन चालकांविरूध्द विशेष अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी दिली.

ठळक मुद्देपोलिस निरीक्षक सपकाळे : ग्रामीण भागात वाहतुक यंत्रणा सुरळीत करण्याचा प्रयत्न

देवळा : देवळा शहर व तालुक्यात एक फेब्रवारीपासून विना हेल्मेट दुचाकीस्वार व सिटबेल्टचा वापर न करणाऱ्या चारचाकी वाहन चालकांविरूध्द विशेष अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी दिली.नाशिक शहरात हेल्मेट सक्ती व सिट बेल्ट बाबत नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनचालकांवर दंडात्मक व न्यायिक कारवाई करण्यात येते. यामुळे वाहनचालकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळून शहरी भागात होणार्या अपघातात जिवित हानी होण्याच्या घटनांचे प्रमाण कमी झाले. ग्रामीण भागात मात्र वाहनचालकांकडून सर्रास नियमांचे उल्लंघन होतांना दिसते, यामुळे अनेक अपघात घडून येतात व हकनाक माणसे बळी जातात. यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दिनांक १ फेब्रुवारी २०१९ पासून हेल्मेट सक्तीबाबत विशेष अभियान राबविण्यात येणार आहे.देवळा तालुक्यात पोलिस ठाण्यातर्फे भित्तीपत्रके लावून जनजागृती करण्यात येत आहे. सदर मोहिमेदरम्यान मोटार वाहन नियमांचे उल्लंघन करण्याºया वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. विशेष करुन मोटारसायकलस्वाराने हेल्मेट न घालणे, चारचाकी वाहनावरील चालकांनी शिट बेल्टन लावता वाहन चालविणे या बाबी निदर्शनास आल्यास संबंधितांवर दंडात्मक व कायदेशिर कारवाई करण्यात येणार आहे. जनजागृतीसाठी वाहन चालकांसाठी संपूर्ण शहर व तालुक्यातील दर्शनी भागात वाहतूक नियम व हेल्मेट सक्ती विषयी मार्गदर्शक भित्तीचित्रे लावण्यात आले आहेत.(फोटो ३१ आरटीओ) देवळा येथे एका वाहनाला भित्तीपत्रक लावतांना पोलिस कर्मचारी.