शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
2
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
3
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
4
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
5
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
6
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
8
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
9
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
10
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
11
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
12
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
13
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
14
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
15
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
17
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
18
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
19
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
20
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!

मीटर रिडिंगची मिळणार पूर्वसूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 12:48 AM

घरामधील वीजमीटर आता बाहेर बसविण्यात आल्याने आपल्या मीटरचे रिडिंग केव्हा होते आणि किती रिडिंग घेतले गेले याची माहिती ग्राहकाला होत नाही किंबहुना वीज बिल आल्यानंतर अनेक शंका निर्माण होत असल्याने आता ग्राहकांना एक दिवस अगोदरच मीटर रिडिंगची पूर्वसूचना मिळणार आहे.

नाशिक : घरामधील वीजमीटर आता बाहेर बसविण्यात आल्याने आपल्या मीटरचे रिडिंग केव्हा होते आणि किती रिडिंग घेतले गेले याची माहिती ग्राहकाला होत नाही किंबहुना वीज बिल आल्यानंतर अनेक शंका निर्माण होत असल्याने आता ग्राहकांना एक दिवस अगोदरच मीटर रिडिंगची पूर्वसूचना मिळणार आहे.ग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटर रिडिंग आणि वीज बिलात अचुकता व पारदर्शकता रहावी यासाठी महावितरणच्या ग्राहकांना आता मीटरचे रिडिंग कोणत्या तारखेला आणि किती वाजता घेण्यात येणार आहे, याची पूर्वसूचना ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाइलवर एक दिवस अगोदर एसएमएसद्वारे दिली जाणार आहे. महावितरणने आॅगस्ट २०१६ पासून मोबाइल अ‍ॅपव्दारे मीटर रिडिंग घेण्याची प्रक्रि या सुरू केली आहे. आता वीजमीटर रिडिंग प्रक्रि येत ग्राहकांना आपले मीटर रिडिंग तत्काळ तपासता यावे म्हणून महावितरणकडे नोंदणी केलेल्या अधिकृत मोबाइलवर ग्राहकांना मीटर रिडिंगच्या पूर्वसूचनेचा एसएमएस देण्यात येणार असून, यात सकाळी ८ ते १०, १० ते १२ दुपारी १२ ते ३ आणि ३ ते ५ या दरम्यान कोणत्या वेळेत रिडिंग घेतले जाणार आहे याची माहिती दिली जाणार आहे. यामुळे ग्राहकांची गैरसोय टळणार आहे. असून, रिडिंग घेण्याच्या वेळेस ग्राहकांना उपस्थित राहून योग्य रिडिंग घेतले जात आहे अथवा नाही याची खातरजमा करता येणे शक्य होणार आहे.  महावितरणने १ मार्च २०१९ पासून राज्यातील गणेशखिंड, रास्ता पेठ, कल्याण, नागपूर शहर मंडल, वाशी व ठाणे (मुंब्रा व्यतिरिक्त) अशा सहा मंडलात ग्राहकांना मीटर रिडिंगची पूर्वसूचना देण्याची प्रक्रि या प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली आहे.  यापूर्वी मीटर रिडिंगबाबत अनेक निर्णय घेण्यात आले. मात्र वीजबिलाच्या तक्रारी कमी होऊ शकल्या नाहीत.

टॅग्स :electricityवीजNashikनाशिक