मालेगाव : गोवा राज्यातून धुळे येथे अवैधरीत्या विक्रीसाठी १ लाख ८५ हजार ६४० रुपये किमतीची विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या कलीमउद्दीन उसनुद्दीन शेख याला अटक केली आहे. त्याच्याकडून पवारवाडी पोलिसांनी विदेशी दारूचा साठा व १२ लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण १३ लाख ८५ हजार६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कलीमउद्दीन शेख याला पोलिसांनी न्यायालयात हजरकेले असता न्यायालयाने सोमवार पर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी १२ लाखांचा ट्रक व मद्यसाठा जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार आर. डी. पगारे हे करीत आहेत.गोवा येथून धुळ्याकडे विदेशी मद्याचा साठा जाणार असल्याची माहिती ोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले, पवारवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार मुंबई- आग्रा महामार्गावर पोलीस हवालदार धारणकर, सय्यद, भारत गांगुर्डे, नवनाथ शेलार, अंबादास डामसे, राकेश जाधव आदींनी ट्रक (क्र. एमएच १८ बीए ९२२६) हिची तपासणी केली असता तिच्यात विदेशी कंपनीचे १ लाख ८५ हजार ६४० रुपये किमतीच्या मद्याचे ६२ बॉक्स आढळून आले.
मालेगाव शहरात विदेशी मद्यसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 10:37 PM