गोकुळ सोनवणे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातपूर : कोरोनामुळे रोजगार गेल्याने उपासमार व्हायला लागली म्हणून औद्योगिक क्षेत्रातील परप्रांतीय कामगारांचे जथ्थेच्या जथ्थे आपल्या गावाकडे निघाले आहेत. पण उद्योग सुरू झाल्याने हाताला काम मिळू लागले म्हणून काही परप्रांतीय कामगारांनी नाशिकमध्येच राहण्याचा निश्चय केला आहे. अन्य कामगारांनीही जाऊ नये म्हणून आग्रह धरीत आहेत.गावाकडे जाऊन काय करणार, तिकडेही अशीच परिस्थिती आहे. आता येथे काम मिळाल्याने पोटापाण्याचा प्रश्न सुटला आहे. लवकरच सर्व काही सुरळीत होईल, असा ठाम विश्वास या कामगारांनी व्यक्त केला आहे.कोरोना विषाणूजन्य रोगाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने २४ मार्चपासून लॉकडाउन आणि संचारबंदी जाहीर केल्याने कारखाने पूर्णत: बंद ठेवण्यात आले होते. या लॉकडाउनच्या काळात कारखान्यात काम करणाºया कंत्राटी कामगारांचा रोजगार बुडाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. लॉकडाउनच्या काळात सामाजिक संस्था, दानशूर यांच्याकडून जीवनावश्यक वस्तू आणि पोटासाठी अन्न मिळाले. परंतु लॉकडाउन कधी संपणार, संपल्यानंतर रोजगार मिळेल का याची शाश्वती नसल्याने या कामगारांनी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. संचारबंदीमध्ये शिथिलता आल्यानंतर या कामगारांचे जथ्थेच्या जथ्थे आपल्या गावाकडे निघालेत. काही खासगी वाहनाने तर काहींची व्यवस्था सरकारने केली.एकीकडे असे चित्र असले तरी लॉकडाउनमध्ये २० एप्रिलनंतर शिथिलता दिल्याने कारखाने सुरू करण्यास परवानगी मिळाली. कारखाने सुरू झालेत आणि कंत्राटी कामगारांनाही रोजगार उपलब्ध झाला आहे. या कामगारांच्या चेहºयावर हास्य फुलले आहे.काही दिवसांतच सर्व काही व्यवस्थित होईल, असा विश्वास निर्माण झाला आहे. पोटापाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. त्यामुळे बहुतांश कामगारांनी गावाकडे जाण्याचा निर्णय बदलला आहे. अन्य सहकारी कामगारांनीही येथेच थांबावे, गावाकडे जाऊ नका असा आपुलकीचा सल्ला हे कामगार एकमेकांना देत आहेत.गावाकडे जाण्याचा विचार मनात आला होता; पण लॉकडाउनच्या काळात कंपनी मालकाने आम्हाला पूर्ण वेतन दिले. शिवाय आमच्यावर उपासमारीची वेळ येऊ दिली नाही. आम्हाला धीर दिला. गावाकडे गेलो असतो तर तेथेही कोरोना आहेच. तेथे जाऊन काय करणार? चौदा दिवस क्वारंटाइन व्हावे लागले असते. त्यामुळे नाशिकमध्ये राहणेच सोयीचे आहे.- बंकिमचंद्र मुरमू पारडी, पुरु लिया, पश्चिम बंगाल रोजीरोटीसाठी आपल्या शहरात आलेले परराज्यांतील कामगारांना धीर देण्याचे प्रत्येकाने केले पाहिजे. स्थानिक आणि परप्रांतीय असा दुजाभाव कधीही केला नाही. कंपनी म्हणजे एक कुटुंब, परिवार आहे. कंत्राटी असला तरी परिवाराचा एक सदस्य आहे. प्रत्येक सदस्यांची काळजी घेण्याची जबाबदारी आपली आहे. त्यांना वाºयावर कसे सोडता येईल. कठीण काळात त्यांना सांभाळून घेतले आहे.- विवेक पाटील, संचालक, युनायटेड हिट ट्रान्सफर, अंबडलॉकडाउनमध्ये कंपनी बंद होती. म्हणून गावाकडे जायचे होते, परंतु गावाकडे जाऊन काम मिळेल का, असा विचार केला आणि गावाला जाण्याचे रद्द केले. आमच्या कंपनी मालकाने आम्हाला राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था केली. पूर्ण पगार दिला. आमच्या गावातील लोकांनीसुद्धा आमची एवढी काळजी घेतली नसती. उलट त्रासच झाला असता. - राजेश प्रजापती, आझमगड, उत्तर प्रदेशकोरोना संपूर्ण देशात आहे.गावाला गेलो तर गाव आपल्याला घेईल का, तेथे काम मिळेल का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. लॉकडाउनच्या दोन महिन्यांच्या काळात आमच्या कंपनी मालकाने आम्हाला खूप धीर दिला. आमच्यासाठी खूप कठीण काळ होता. आता कोणतीही भीती राहिली नाही. कंपनी सुरू झाली. काम सुरू झाले. आता गावाला जाण्याची गरज राहिलेला नाही.- शंकर यादव, भागलपूर, बिहार
हाताला काम मिळाल्याने परप्रांतीयांचा गावी जाण्यास नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 10:25 PM
सातपूर : कोरोनामुळे रोजगार गेल्याने उपासमार व्हायला लागली म्हणून औद्योगिक क्षेत्रातील परप्रांतीय कामगारांचे जथ्थेच्या जथ्थे आपल्या गावाकडे निघाले आहेत. पण उद्योग सुरू झाल्याने हाताला काम मिळू लागले म्हणून काही परप्रांतीय कामगारांनी नाशिकमध्येच राहण्याचा निश्चय केला आहे. अन्य कामगारांनीही जाऊ नये म्हणून आग्रह धरीत आहेत.
ठळक मुद्देउद्योग सुरू झाल्याने समाधानी : गावाकडे जाणाऱ्या जत्थांच्या विपरीत चित्र