नाशिक : येवला तालुक्यातील ममदापूर राखीव संवर्धन क्षेत्र काळवीटांसाठी प्रसिध्द आहे. या वनक्षेत्रातील सुमारे दोन वर्षांचे एक काळवीट वाट चूकून लगतच्या एका शेतातील उघड्या विहिरीत पडले. सुदैवाने शेतकऱ्यांच्या ही बाब वेळीच लक्षात आल्याने वनकर्मचाऱ्यांना त्यास जीवदान देण्यास यश आले.ममदापूर राखीव संवर्धन क्षेत्र हे काळवीटांचा नैसर्गिक अधिवास बनला आहे. वन विभाग नाशिक पुर्वच्या अखत्यारितीत असलेल्या ममदापूर-राजापूर राखीव संवर्धन क्षेत्रातून एक नर काळवीट वाट चुकले. शुक्रवारी (दि.११) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास हे काळवीट गोल्हेवाडी येथील अशोक बारे यांच्या शेतातून उड्या घेत पळत असताना अचानकपणे अंदाज चुकल्याने विहिरीत कोसळले. पाण्याचा आवाज आल्याने शेतमजूरांनी विहिरीच्या दिशेने धाव घेतली असता विहिरीत पाण्यात काळवीट पोहत असल्याचे त्यांना आढळले. याबाबत तत्काळ त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांनी वनरक्षक प्रसाद पाटील, पंकज नागपुरे, गोपाळ हरगावकर, विलास देशमुख आदिंना घेऊन बारे यांचे शेत गाठले. गट क्रमांक ५१६मधील एका उघड्या विहिरीत त्यांना काळवीट पडल्याचे आढळले असता भंडारी यांनी वनरक्षकांच्या मदतीने तत्काळ ‘रेस्क्यू’ आॅपरेशन सुरू केले. शेतकºयांकडून लहान खाट घेत तीला चारही बाजूंनी दोरखंड बांधून विहिरीत सोडले. खाट विहिरीच्या पाणीपातळीपर्यंत पोहचली असता काळवीट विहिरीच्या आतील एका लहानशा कपारीजवळ येत खाटेवर अलगद येऊन बसले. त्यानंतर वनरक्षकांनी हळुवारपणे एकाचवेळी चारही बाजूंनी खाट वर ओढण्यास सुरूवात केली. विहिरीच्या कठड्याजवळ खाट आली असता काळवीटाने शेतात उडी घेत संवर्धन राखीव वनक्षेत्राकडे धाव घेतली. दरम्यान, भंडारी यांनी या भागातील शेतकºयांचे प्रबोधन करत उघड्या विहिरीवर लोखंडी जाळ्यांचे आच्छादन टाकण्याचे आवाहन केले. जेणेकरून काळवीटासारख्या वन्यजीवांचे संरक्षण होण्यास मदत होईल.
वनविभागाची तत्परता : विहिरीत पडलेल्या काळवीटाचे वाचविले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 8:40 PM
वन विभाग नाशिक पुर्वच्या अखत्यारितीत असलेल्या ममदापूर-राजापूर राखीव संवर्धन क्षेत्रातून एक नर काळवीट वाट चुकले.
ठळक मुद्देअंदाज चुकल्याने विहिरीत कोसळलेउघड्या विहिरीवर लोखंडी जाळ्या टाकण्याचे आवाहन