नाशिक : वनविभागाच्यानाशिक पश्चिम भागाकडे असलेल्या गस्तीपथकांच्या वाहनांसह वनक्षेत्रपाल, सहायक वनसंरक्षक यांची वाहनेही जणू आता बोलती झाली आहे. अर्थात या वाहनांवर आधुनिक स्वरूपाचे लहान भोंगे बसविण्यात आले आहे. जनसामान्यांना सावध करणारी पोलिसांसारखी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. याद्वारे एका खास ध्वनीफितीच्या माध्यमातून बिबटविषयी जनजागृतीला प्रारंभ करण्यात आला आहे.पोलीस, महापालिका, अग्निशमनदल, आरोग्यसेवा यांसारख्या अपात्काली अस्थापनांइतकीच महत्त्वाची अस्थापना म्हणून वनविभागाची ओळख आहे; मात्र वनविभाग अद्याप दुर्लक्षित खाते असेच समजले जाते. बदलती मानवी जीवनशैली आणि जंगलांचा होणारा ºहास यामुळे आता वन्यप्राणी-मानव संघर्ष शहरांसह ग्रामीण भागातसुध्दा पहावयास मिळू लागला आहे. शहराजवळचे गोदावरी, दारणा नदीचे खोरे असो किंवा दिंडोरी तालुक्यातील कादवाचे खोरे असो की मग निफाड तालुका असो. या भागातील गावांमध्ये बिबट-मानव संघर्ष उभा राहिलेला दिसून येतो. बिबट्या जसा जंगलात राहतो, तसा तो जंगल आणि मानवी वस्तीच्या सीमेवरही अधिवास करणारा वन्यप्राणी आहे. कुठल्याही अधिवासाशी जुळवून घेण्याचे नैसर्गिक कौशल्य त्याकडे आहे. यामुळे नदी, नाल्यांच्या खोऱ्यात ऊसशेतीच्या आसºयाने सध्या नाशिक, निफाड, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्नर या तालुक्यांमध्ये बिबट्या गुजराण करत आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करत आहेत. मात्र अनेकदा बिबट्याचा हा संघर्ष मानवाला जीवघेणा वाटतो. बिबट्याकडून मानवावर होणारे हल्ले याला कारणीभूत आहे. त्यासाठी आता मानवाला शहाणे करण्याकरिता वनविभागाने जनजागृतीची मोहीम दारणा नदीकाठाच्या गावांमध्ये हाती घेतली आहे. यामुळे नक्कीच नागरिकांचे प्रबोधन होण्यास मदत होईल, अन संभाव्य दुर्घटना टाळता येतील असा आशावाद वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी व्यक्त केला आहे.---या गावांमध्ये नियमीत गस्त अन् जनजागृतीगोदावरी, दारणा, वालदेवी या नद्यांच्या काठालगत असलेल्या वनविभागाच्या नाशिक परिमंडळातील चेहडी, चांदगिरी, दसक-पंचक, नानेगाव, शिंदे, पळसे, हिंगणवेढे, जाखोरी, एकलहरे, चाडेगाव, देवळाली कॅम्प, बेलतगव्हाण, भगूर, दोनवेडा, लहवीत, पिंपळगाव खांब या गावांमध्ये सध्या बिबट्यांची संख्या चांगलीच वाढली आहे. यापैकी हिंगणवेढा, दोनवाडे गावात बिबट-मानव संघर्षाच्या दोन घटन पंधरवड्यापुर्वी घडल्याने दोन मुलांचा बळी गेला. त्यामुळे या गावांमध्ये वनविभागाचे गस्तीपथक सातत्याने गस्तीवर असून वाहनांवर बसविलेल्या ध्वनिक्षेपकांद्वारे प्रबोधनपर विशेष ध्वनीफितही वाजविली जात आहे....अशी आहे ध्वनीफितसुरुवातील धोक्याचा सायरन अन् सोबत बिबट्याच्या डरकाळ्या ध्वनीफितीतून ऐकू येतात अन् तत्काळ सावधान रहा, सतर्कता बाळगा असे शब्द कानी पडतात. नाशिक वनपरिक्षेत्रातील सर्व नागरिकांना महत्त्वाची सुचना, वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. बिबटचा वावर आपल्या परिसरात आढळून आला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी अन् त्यासंदर्भातील उपाययोजना दोन मिनिटांच्या ध्वनिफितीतून सांगितल्या गेल्या आहेत.
...अन् वनविभागाची वाहनेही आता बोलू लागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 7:19 PM
सुरुवातील धोक्याचा सायरन अन् सोबत बिबट्याच्या डरकाळ्या ध्वनीफितीतून ऐकू येतात अन् तत्काळ सावधान रहा, सतर्कता बाळगा असे शब्द कानी पडतात.
ठळक मुद्देसावधान रहा...सतर्कता बाळगावनविभागाची जनजागृतीपर ध्वनीफित