त्र्यंबकेश्वरजवळील ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक महत्त्वप्राप्त असलेल्या ब्रह्मगिरी पर्वत गोदावरीचे उगमस्थान आहे. या पर्वताभोवती जैवविविधता समृद्ध असली तरी वारंवार या नैसर्गिक समृद्धतेला नख लावण्याचा प्रयत्न काही भूमाफियांकडून होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. आठवडाभरापूर्वी असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. थेट ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी जेसीबी, पोकलॅनसारखी अजस्त्र यंत्रे जणू या पर्वताच्या पायथ्याला नाचविली जात आहे की काय, असे चित्र पहावयास मिळत होते. याबाबत पर्यावरणप्रेमींनी आवाज उठविल्यानंतर ‘ब्रह्मगिरी वाचवा’ या चळवळीने सोशल मीडियावर जोर धरला. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत जिल्हा प्रशासनाचे कान टोचले. यानंतर तत्काळ जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले. मंडल अधिकारी यांनी खासगी जमीनमालकाला नोटीसही बजावली. दरम्यान, उत्खननात ब्रह्मगिरीच्या आजूबाजूला असलेल्या वृक्षसंपदेलाही हानी पोहोचली. वनजमिनीत खोदकाम करत नसून खासगी जागेत करत असल्याचा दावा संबंधितांकडून करण्यात आला होता. मात्र वनखात्याची हद्द कोठून सुररू होते आणि नेमकी कोठे संपते याविषयी संभ्रमावस्था असल्याने उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांनी ब्रह्मगिरीचा पायथा गाठला. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक गणेश झोळे यांना याबाबत आदेश देत जुन्या नोंदीवरून माहिती घेत प्रत्यक्षपणे सर्वेक्षण केले जाणार आहे.
यानुसार १९३० सालापासूनचे सातबारे उतारे, ड-पत्रकवरील फेरफार नोंदी तपासल्या जात असल्याचे झोळे यांनी सांगितले.
--इन्फो--
वनजमिनींमध्ये घुसखोरीचा संशय?
ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी खोदकाम करताना वनजमिनीमध्ये घुसखोरी करण्यात आल्याची चर्चा सोशल मीडियावरून सुरू झाली. वनजमिनीला बाधा पोहोचल्याचा संशय पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केला जाऊ लागला. यामुळे नाशिक पश्चिम वनविभागाने याबाबत गंभीर दखल घेत उत्खनन करण्यात आलेली जागा वनजमीन आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी सूक्ष्मपणे जुन्या नोंदीचा अभ्यास सुरू केला आहे. यानंतरच चित्र स्पष्ट होऊ शकणार आहे. वनविभागाच्या जागेत अतिक्रमण केल्याचे आढळून आल्यास वन कायद्यानुसार गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे पंकज गर्ग यांनी सांगितले.
---इन्फो---
जैवविविधता कायद्याचा भंग?
ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी उत्खनन करताना राज्य जैवविविधता संवर्धन कायद्याचा संबंधितांकडून भंग करण्यात आल्याचेही बोलले जात आहे. यामुळे जैवविविधतेला पोहोचलेल्या हानीचा अभ्यास करून त्यादृष्टीनेही वनविभागाने कारवाई करण्याच्या हालचाली सुरू केल्याची माहित्री सूत्रांनी दिली आहे.
---
फोटो आर वर ०१ ब्रह्मगिरी नावाने सेव्ह
===Photopath===
010621\01nsk_32_01062021_13.jpg
===Caption===
ब्रम्हगिरी पर्वत (संग्रहित)