किकवारी, दसाने, नरकोळ येथील मोंड्या, जाळ्या, मडक्या, काकरीणीनीमाळ, रोहा, वागदारा येथील हजारो हेक्टर जंगलात मोठ्या प्रमाणात साग, सालय, सीताफळ, हेकळ, अमोनी, पळस, वड, पिंपळ, आंबा, चिंच, बांबू, पळस आदी नैसर्गिक अधिवासात मोठ्या प्रमाणात वनसंपदा होती. तसेच जंगल अधिक असल्याने व शेजारी गुजरात राज्य असल्यामुळे या भागात असंख्य प्रकारचे वन्यप्राणी, पशुपक्षी वास्तव्यास होते. तसेच बिबट्या, तरस, वानर, कोल्हे, सरपटणारे प्राणी, मोर, पशुपक्षी मोठ्या प्रमाणात आहेत. आगीचे प्रमाण एवढे मोठे होते की, तीस तासांपेक्षा अधिक वेळ होऊनही सोमवार सायंकाळपर्यंत आग विझवण्यात यश आले नव्हते.
वनपरिक्षेत्र अधिकारी हिरे यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसह व यशवंतनगर येथील ३० ते ४० मजुरांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. दसाणे येथील शेतकरी सीताराम सोनवणे यांनी सांगितले की, आगीचे प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे वनसंपदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
बागलाण तालुक्यात काही ठिकाणी प्रचंड प्रमाणात जंगल आहे. अशा जंगल-डोंगरांना संबंधित विभागाने कंपाउंड करून व वनविभाग कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत तरच येथील वनसंपदा व वन्यजीव यांचे रक्षण होऊन पर्यावरणाचा समतोल राहण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.
फोटो : १६ सटाणा फायर
दसाणे येथील वनविभाग हद्दीतील आग विझवताना रोजंदारी कर्मचारी.
===Photopath===
160321\16nsk_23_16032021_13.jpg
===Caption===
दसाणे येथील वन विभाग हद्दीतील आग विझवताना रोजंदारी कर्मचारी.