जिल्'ातील आदिवासीना लवकरच वन पट्ट्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 11:48 PM2020-10-06T23:48:02+5:302020-10-07T01:08:41+5:30

नाशिक: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यामुळे नाशिक जिल्'ातील आदिवासीना लवकरच आदिवासी विकास मंत्राच्या उपस्थितीत वन पट्ट्याचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी दिली.

Forest leases will be allotted to the tribals of the district soon | जिल्'ातील आदिवासीना लवकरच वन पट्ट्याचे वाटप

जिल्'ातील आदिवासीना लवकरच वन पट्ट्याचे वाटप

Next
ठळक मुद्देकाँग्रेसची बैठक: मंजूर प्रकरणे प्रलंबित

नाशिक: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यामुळे नाशिक जिल्'ातील आदिवासीना लवकरच आदिवासी विकास मंत्राच्या उपस्थितीत वन पट्ट्याचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी दिली.
मंगळवारी नाशिक जिल्हा काँग्रेस आदिवासी विकास विभागाची बैठक महाराष्ट्र कॉंग्रेस आदिवासी विभागाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यालयात झाली. यावेळी ते म्हणाले, काँग्रेसच्या काळात वन जमिनीसाठी वन जमीन हक्क कायदा मंजूर करून देशामध्ये अनेक आदिवासी कुटुंबांना वन जमिनीचे वाटप करण्यात आले. परंतु मध्यंतरीच्या काळात ही योजना राबविली नाही. आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असुन, आदिवासीचे मंजूर प्रकरण असूनही वन पट्ट्याचे वाटप झाले नाही. नाशिक जिल्'ातील आदिवासींचे मंजूर प्रलंबित प्रकरण तात्काळ वाटप करण्यासाठी राज्याचे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांची भेट घेऊन त्यांच्या परवानगीने प्रमुख उपस्थित लवकरच वनजमिनीचे पट्टे संबंधित वाटप केले जाणार आहे. त्यांनी सांगितले. या बैठकीत हाथरस येथील घटनेचा व खासदार राहुल गांधी व प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश सरकारकडून पोलिसांद्वारे मिळालेल्या वागणुकीचा बैठकीत निषेध करण्यात आला.बैठकीस जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष, काँग्रेसचे नेते रमेश कहाडोळे, रामचंद्र चौधरी, दिगंबर गिते, ज्ञानेश्वर काळे, गोपाळराव लहांगे, भिका पाटील चौधरी, भारतीताई भोये, विशाल जाधव, सखाराम भोये, धर्मराज जोपळे, शिवाजी बर्डे, सुधाकर मोरे, काशिनाथ जोपळे, शरद चौरे, अशोक शेंडगे, तुकाराम जाधव, कचरू गांगुर्डे, भरत महाले, संजय निकम, राजाभाऊ गुळवे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

 

Web Title: Forest leases will be allotted to the tribals of the district soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.