नाशिक : जिल्ह्यात घनदाट जंगलाचे प्रमाण शून्य जरी असले तरी मध्यम स्वरूपाचे जंगल काही भागांत काही प्रमाणात टिकून आहे. अशा जंगलांच्या परिसरातील चार ठिकाणांची निवड करत पौर्णिमेच्या चांदण्या रात्री नाशिक वन-वन्यजीव विभागाकडून वन्यप्राणी प्रगणना मोहीम हाती घेण्यात आली.सालाबादप्रमाणे यंदाही बुद्ध पौर्णिमेनिमित्ताने चांदण्या रात्री नाशिक वन्यजीव विभागाच्या वतीने विभागीय क्षेत्रातील नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्य (निफाड), कळसुबाई-हरिश्चंद्र गड अभयारण्य (अहमदनगर), अणेर धरण परिसर (धुळे), यावल अभयारण्य (जळगाव) या ठिकाणी नाशिक विभागीय वन्यजीव कार्यालयाच्या वतीने २४ तासांची प्रगणना मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये वनरक्षक, वनमजुरांनी सहभाग घेतला. सुमारे पंधरा कर्मचाऱ्यांनी यामध्ये सहभागी होऊन निरीक्षण मनोºयांवरून दुर्बिणीच्या सहाय्याने जंगल परिसरात नजर ठेवत दर्शन देणाºया प्राण्यांची नोंद केली. ही मोहीम मंगळवार संध्याकाळपर्यंत सुरू राहणार असून, या मोहिमेसाठी कर्मचाºयांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला प्रगणना मोहीम राबविली जाते. गेल्या वर्षी २२ प्राण्यांची नोंद करण्यात यश आले होते, अशी माहिती वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांनी दिली. मोहीम पूर्ण होताच वन्यजीव विभागाकडून प्रगणनेअंतर्गत नोंदी झालेल्या वरील चार ठिकाणांची आकडेवारीची माहितीचे प्रसिद्धीपत्रक दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.गेल्या वर्षाची आकडेवारीच्कोल्हे-८, बिबटे-२, रानडुक्कर-७, मुंगूस-४, तरस-१ असे एकूण २२ वन्यप्राणी गेल्या वर्षी बुद्ध पौर्णिमेच्या चांदण्या रात्री प्रगणनेत आढळून आले होते. नाशिक विभागाच्या हद्दीत अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार या तीन जिल्ह्णांचा समावेश होतो. नाशिकमधील केवळ निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्य परिसरात वन्यप्राण्यांची प्रगणना करण्यात आली. जवळपास जंगलाचे प्रमाण अत्यंत कमी व पाणवठ्यांची संख्याही कमी आहे.
चांदण्या रात्री जंगलात प्राणिगणना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2018 1:52 AM