नाशिक : वन संरक्षणासाठी वनविभागाकडून जरी प्रयत्न होत असले तरीदेखील वनांच्या अस्तित्वाला कधी तस्करांकडून, तर कधी समाजकंटकांकडून धोका निर्माण केला जातो. सीमावर्ती भागातील जंगलांमध्ये गुजरातस्थित तस्करांची घुसखोरी होते, तर जिल्ह्यातील पश्चिम भागातील विविध गावांमध्ये असलेल्या वनांची मानवनिर्मित वणव्यांनी मोठ्या प्रमाणात कधीही न भरून निघणारी हानी झाली. गतवर्षी वणव्याच्या तब्बल १६ घटनांमध्ये सुमारे २२३ हेक्टरवरील वनसंपदा आगीत होरपळली.
नाशिक जिल्हा भौगोलिकदृष्ट्या अत्यंत संपन्न मानला जातो. सह्याद्रीची प्रमुख रांग जिल्ह्याच्या पश्चिमेकडून दक्षिणोत्तर बाजूने जाते, तर सह्याद्रीच्या तीन शाखा जिल्ह्याच्या पूर्व-पश्चिम भागात पसरलेल्या पहावयास मिळतात. जिल्ह्यात सुमारे ३८ डोंगरी गडकिल्ले असून, त्यापैकी २५ सह्याद्रीत आणि १५ सातमाळा रांगेत आहेत. त्र्यंबकेश्वर डोंगररांगेतून उगम पावणाऱ्या गोदावरी या मुख्य नदीसह दारणा, बाणगंगा गिरणा नद्यांचे प्रशस्त खोरे या जिल्ह्याला सुजलाम-सुफलाम करते. जिल्ह्यात वनसंपदा अद्यापही बऱ्यापैकी टिकून आहे. यास सह्याद्री-सातमाळा पर्वतरांगेचे मोठे योगदान आहे. या वनांच्या संरक्षणाची प्रमुख जबाबदारी नाशिक विभागाने जिल्ह्याच्या पूर्व-पश्चिम अशा दोन वनविभागांवर सोपविली आहे.
नाशिक पश्चिम वनविभागाच्या हद्दीत मागील वर्षी ४ फेब्रुवारी रोजी रोहिले येथील वनक्षेत्राला किरकोळ स्वरूपात आग लागल्याची पहिली घटना घडली. आगीच्या घटनांमध्ये येथून वाढच होत गेली. मार्चमध्ये दाखल झालेल्या कोरोनाच्या गंभीर आजाराला अटकाव करण्यासाठी मार्चअखेरीस लॉकडाऊन घोषित करण्यात आले. एकीकडे लॉकडाऊनची अंमलबजावणी होत असताना दुसरीकडे मात्र जिल्ह्यात रान पेटत होते. १एप्रिलपासून जंगले पेटण्याची सुरू झालेली मालिका डिसेंबरअखेरपर्यंत सुरूच राहिली होती.
---आलेख---
२०२०साली घडलेल्या आगीच्या घटना....(आलेख करावा)
फेब्रुवारी : १६/ मार्च :१५/ एप्रिल : ४४/ मे : ३१/ नोव्हेंबर : ३ डिसेंबर : १२
---इन्फो--
२०२१ची सुरुवातच वणव्याने
२ जानेवारी रोजी नांदुरशिंगोटे येथील वन कक्ष क्रमांक २६२/२६८मध्ये आगीचा भडका उडाला. या दोन्ही घटनांमध्ये सुमारे साडेतीन हेक्टरवरील वनक्षेत्र बाधीत झाले. फेब्रुवारीमध्ये चुंचाळे येथील वन कक्ष क्रमांक २२७मध्ये असलेल्या डोंगरालगतच्या वनात आगीचा भडका उडाला होता. यामध्ये सुमारे तीन हेक्टरवरील वनसंपदा बाधित झाली. विशेष म्हणजे ही घटना वनवणवा प्रतिबंध सप्ताहात घडली होती. २मार्च रोजी रात्री गिरणारेजवळील रोहिले येथील वन कक्ष क्रमांक ४९३मध्ये वणवा भडकला होता. या वणव्यात ११हेक्टरवरील गवताची राख होऊन २१० रोपे जळाली होती.
---इन्फो--
पहिनेला सर्वात मोठा वणवा
मागील वर्षभरात जिल्ह्यात कोठेही इतका मोठा वणवा जंगलात भडकला नव्हता, तो यावर्षी ५मार्चच्या संध्याकाळी त्र्यंबकेश्वरजवळील पर्यटकांच्या पसंतीच्या पहिने शिवारातील जंगलात भडकला. ही आग विझविण्यासाठी संपूर्ण गावाने धाव घेतली होती. या आगीत सुमारे ३७हेक्टरवरील वनसंपदा जळून खाक झाली, तर २५ हजार रोपे आगीत नष्ट झाली होती. दोन उच्चशिक्षित संशयितांना वनविभागाने या गुन्ह्यात अटकही केली होती.
---
फोटो आर वर २०फायर/२०फायर१ नावाने सेव्ह आहे.
===Photopath===
200321\20nsk_34_20032021_13.jpg~200321\20nsk_35_20032021_13.jpg
===Caption===
जंगलात पेटलेला वणवा~जंगलात पेटलेला वणवा