शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

नववसाहतीत मोकळे भूखंड बनले जंगल

By admin | Published: August 30, 2016 1:34 AM

साफसफाईची मागणी : महापालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाचे दुर्लक्ष

पाथर्डी फाटा : परिसरातील वासननगर, प्रशांतनगर, ज्ञानेश्वरनगर भागातील मोकळे भूखंड अस्वच्छतेचे आगर बनले असून, सध्या या भूखंडांवर झाडाझुडपांचे जंगल वाढल्याने आजूबाजूच्या रहिवाशांना धोका निर्माण झाला आहे. मनपाच्या आरोग्य व स्वच्छता विभागाने या भूखंडांची स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पाथर्डी फाटा परिसर हा अलीकडच्या काळात झपाट्याने विकसित होऊन नागरी वस्ती विस्तारलेला मोठा भाग आहे. असे असूनदेखील परिसरात अनेक भूखंड मोकळे पडून आहेत. हे खासगी भूखंड वर्षानुवर्षे मोकळे राहिल्याने येथे झाडाझुडपांचे जंगल वाढलेले पहायला मिळते. शिवाय परिसरातील नागरिक व महिला घरातील कचरा, शिळे अन्न, छाटलेल्या झाडांच्या फांद्या आदि गोष्टी आणून टाकण्यासाठी सर्रासपणे या भूखंडांचा वापर करतात. परिणामी कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. ज्या इमारती किंवा घराशेजारी हे भूखंड आहेत तेथील हिवाशांना प्रचंड त्रासास सामोरे जावे लागत आहे. तेथे साचलेल्या कचऱ्यांमुळे दुर्गंधी, अस्वच्छता, डास व चिलट्यांचा त्रास शेजारच्या घरांना सहन करावा लागतो. वाढलेली झाडे, झुडपे व गवतामुळे साप, विंचू व इतर किटकांचा धोका नेहमीच जाणवत राहतो. परिणामी आरोग्यासोबत सुरक्षितताही धोक्यात येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या भूखंडांच्या स्वच्छतेची जबाबदारी नेमकी कोणाची, महापालिकेची की भूखंड मालकांची अशा भ्रमात नागरिक राहताना दिसून येतात. कधी कधी शेजारी राहणारे लोक भूखंड स्वखर्चाने साफ करूनही घेतात. मात्र परिसरातील लोक पुन्हा कचरा टाकून तो अस्वच्छ करत असल्याने बाधितांनी असा खर्च किती वेळा करावा, असा प्रश्न निर्माण होतो. शिवाय कचरा टाकणाऱ्यांना अडवायला गेल्यास बऱ्याच वेळा नाहक वादावादी होण्याचे प्रकार होत असल्याचे अनुभव नागरिकांनी कथन केले आहेत. सध्या पावसाळी वातावरणामुळे या भूखंडांवर मोठं-मोठी बाभळीची झाडे, काटेरी झुडपे, कमरे इतक्या उंचीचे गवत व वेली वाढल्या असल्याने घरांशेजारी जंगल निर्माण झाल्याची परिस्थिती ठिकठिकाणी दिसून येते. या भूखंडांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने, त्यात कुजणारा कचरा, तेथे विश्रांती घेणारी भटकी कुत्री व मोकाट जनावरे यांचाही त्रास रहिवाशांना होत आहे.