पंचवटी : सेवाकुंज समोरील रस्त्याने जाणाऱ्या चारचाकीला थांबवून काच फोडून हातात धारदार शस्त्रे नाचवत रस्त्याने ये-जा करणाऱ्या तसेच नागरी वसाहतीत चौकातील काही उभ्या युवकांच्या अंगावर धावून जात सात ते आठ जणांच्या टोळक्याने दहशत माजविण्याचा प्रकार पंचवटी परिसरात सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमाराला घडला आहे.सदर घटनेची माहिती पंचवटी पोलिसांना मिळताच गुन्हा शोध पथकातील पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडून धारदार शस्त्रे जप्त केल्याचे समजते.सोमवारी रात्री परिसरात घडलेल्या या घटनेने नागरिकांत पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे. गावठाण भागातील वसाहतीत हातात खुलेआम धारधार शस्त्रे मिरवून दहशत माजविण्याचा प्रयत्न करणारे गुन्हेगारी टोळीशी संबंधित असून सदर संशयित गंगाघाट तसेच वाघाडी परिसरात राहणारे असून त्यांच्याकडून आगामी काळात गुन्हे घडण्याची दाट शक्यता आहे, असे पोलिसांनी सांगितले.रात्री पावणे नऊ ते नऊ वाजेच्या सुमाराला वाघाडीकडून सहा ते सात जणांचे टोळके आले त्यातील तीन ते चार जणांकडे धारदार कोयते होते त्यातील दोघांनी सेवाकुंज रस्त्याने जात असलेल्या चारचाकी वाहनाला रस्त्यावर थांबवून काच फोडली त्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या एका दुचाकी वाहन चालकावरदेखील शस्त्रे उगारल्याचे काही बघ्यांनी सांगितले. टोळक्याने पुढे सेवाकुंज, गजानन चौक, पाथरवट लेन, शिवाजी चौक, राजवाडा परिसरापर्यंत शस्त्रे मिरवत चौकात उभ्या असलेल्या युवकांवर धावून जात शिवीगाळ करत त्यांच्यावरदेखील शस्त्रे उगारल्याचे समजते. दहशत माजविणाऱ्या काही संशयितांना ताब्यात घेतल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला असून काहींचा उशिरापर्यंत शोध सुरू होता.
हातात धारधार शस्त्रे नाचवत दहशत माजविण्याचा प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 11:27 PM
पंचवटी : सेवाकुंज समोरील रस्त्याने जाणाऱ्या चारचाकीला थांबवून काच फोडून हातात धारदार शस्त्रे नाचवत रस्त्याने ये-जा करणाऱ्या तसेच नागरी वसाहतीत चौकातील काही उभ्या युवकांच्या अंगावर धावून जात सात ते आठ जणांच्या टोळक्याने दहशत माजविण्याचा प्रकार पंचवटी परिसरात सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमाराला घडला आहे.
ठळक मुद्दे काही संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडून धारदार शस्त्रे जप्त