शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
4
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
5
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
6
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
7
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
8
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
9
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
10
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
11
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
12
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
13
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
14
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
15
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
16
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
17
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
18
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
19
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान

सार्वत्रिक निवडणुकीचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 1:03 AM

नाशिक मर्चंट बॅँकेचे पावणे दोन लाख सभासद असल्याने या बॅँकेला विधानसभेसारखे स्वरूप येते. यंदा या मल्टी स्टेड शेड्यूल्ड बॅँकेच्या निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणांनी केलेल्या नियोजन आणि नियुक्त केलेले कर्मचारी यामुळे ही बॅँकेची निवडणूक म्हणजे सार्वत्रिक निवडणूक असल्याचा भास निर्माण झाला.

नाशिक : नाशिक मर्चंट बॅँकेचे पावणे दोन लाख सभासद असल्याने या बॅँकेला विधानसभेसारखे स्वरूप येते. यंदा या मल्टी स्टेड शेड्यूल्ड बॅँकेच्या निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणांनी केलेल्या नियोजन आणि नियुक्त केलेले कर्मचारी यामुळे ही बॅँकेची निवडणूक म्हणजे सार्वत्रिक निवडणूक असल्याचा भास निर्माण झाला.नाशिक मर्चंट बॅँकेच्या निवडणुकीत यंदा मोठ्या प्रमाणात चुरस होतीच, शिवाय निवडणुकीत सहभागी उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी तसेच सोशल मीडिया यावरदेखील प्रचाराची रणधुमाळी सुरू केल्याने निवडणुकीतील वातावरणच बदलून गेले होते.या निवडणुकीसाठी सहकार खात्याने प्रथमच मतदान केंद्राधिकारी आणि झोनल आॅफिसर नियुक्त केले होते. सहकार खात्यातील अनेक अधिकारी त्यासाठी नियुक्त होते. सभासद मतदारांचा केवळ नोंदणी क्रमांक ग्राह्य धरून प्रत्यक्षात मात्र त्यांच्याकडील शासकीय ओळख पुरावे बघून मतदान करू दिले जात होते. त्यामुळे नेटके कामकाज होतेच, परंतु पोलिसांनी बंंदोबस्तामुळे आणखीनच व्यापक स्वरूप आणले. मतदान केंद्राजवळ साधे मतदान केंद्र प्रतिनिधींना उभे राहण्याचीही सोय नव्हती. एकूणच कडेकोट बंदोबस्तामुळे ही बॅँकेची निवडणूक की विधानसभेची असा प्रश्न निर्माण होण्याइतपत वातावरण होते.माजी महापौरांचीही अडवणूकसागरमल मोदी शाळेत मतदानासाठी आलेले माजी महापौर विनायक पांडे यांचीही अडवणूक झाली. काही ना काही ओळखपत्र दाखवा, असे सांगून पोलिसांनी अडवल्यानंतर प्रगतीचे उमेदवार प्रफुल्ल संचेती यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला, परंतु उपयोग झाला नाही. अखेरीस त्यांनी मतदानासाठी मतदार म्हणून आलेला मोबाइलवरील एसएमएस दाखवल्यानंतरच त्यांना मध्ये सोडण्यात आले.संस्थेच्या प्रतिनिधी मतदानापासून वंचितअनेक सेवाभावी संस्था, शिक्षण संस्था आणि तसेच सांस्कृतिक संस्थांचे नामको बॅँकेत खाते आहे. संस्थांचे ठराव करून मगच प्रतिनिधींना मतदान करता येते. परंतु त्यासाठी आॅक्टोबर महिन्याच्या आतच मतदान करणाऱ्या प्रतिनिधींच्या नावाचे ठराव सादर करण्याची मुदत होती. संचालकांची राजवट असताना असा निर्णय संस्थाचालकांना कळवला जात होता. मात्र आता प्रशासकीय राजवटीत असे कोणालाही कळवण्यात आले नसल्याने अनेक संस्थाचालक अंधारात होते. मतदानासाठी गेल्यानंतर त्यांना प्रतिनिधींनी मतदान करू न दिल्याने माघारी परतावे लागले.

टॅग्स :ElectionनिवडणूकbankबँकNashikनाशिक