शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

थकीत कर्जाला बॅँकेचे माजी संचालक जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2019 12:17 AM

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या आजी-माजी संचालकांनी जिल्ह्यातील सहकारसम्राटांच्या १२ संस्थांना सढळ हस्ते वाटप केलेले ३४७ कोटींचे कर्ज वसूल होत नसल्याने जिल्हा उपनिबंधकांनी ३८ आजी-माजी संचालकांवर त्याची जबाबदारी निश्चित करण्याच्या नोटिसा बजावून खुलासा मागविल्याने संचालकांची धावपळ उडाली आहे, तर दुसरीकडे कर्जवसुलीसाठी गुरुवारी जिल्हा बॅँकेने निफाड, नासाका कारखान्याच्या संचालक मंडळासह श्रीराम बॅँकेच्या पदाधिकाऱ्यांनाही नोटिसा बजावल्या आहेत.

ठळक मुद्देसहकारच्या नोटिसा : निसाका, नासाकावरही कारवाई

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या आजी-माजी संचालकांनी जिल्ह्यातील सहकारसम्राटांच्या १२ संस्थांना सढळ हस्ते वाटप केलेले ३४७ कोटींचे कर्ज वसूल होत नसल्याने जिल्हा उपनिबंधकांनी ३८ आजी-माजी संचालकांवर त्याची जबाबदारी निश्चित करण्याच्या नोटिसा बजावून खुलासा मागविल्याने संचालकांची धावपळ उडाली आहे, तर दुसरीकडे कर्जवसुलीसाठी गुरुवारी जिल्हा बॅँकेने निफाड, नासाका कारखान्याच्या संचालक मंडळासह श्रीराम बॅँकेच्या पदाधिकाऱ्यांनाही नोटिसा बजावल्या आहेत.जिल्हा सहकारी बॅँकेने सन २००२ ते २०१३ या अकरा वर्षांच्या काळात केलेल्या कर्जवाटपात ३४७ कोटींची थकबाकी असून, बॅँकेने वसुलीसाठी अनेक उपाय करूनही हे कर्ज वसूल होत नसल्याने बॅँकेच्या एनपीए वाढला. या पार्श्वभूमीवर बॅँकेच्याच माजी संचालकांनी या कर्जवाटपाच्या चौकशीची मागणी केली होती. या तक्रारीची दखल घेत तत्कालीन लेखापरीक्षक जयेश आहेर यांनी झालेल्या कर्जवाटपाची सखोल चौकशी केलीहोती.या चौकशीचा अहवाल सहकार विभागाला सादर करण्यात आला होता. यात मोठी थकबाकी असणाºया १२ संस्थांना अनियमित कर्जवाटप झाल्याचा निष्कर्ष नोंदवित बॅँकेचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.या अहवालाच्या आधारे जिल्हा उपनिबंधकांनी सहकार कायदा कलम ८८ अन्वये कारवाई आरंभली असून, त्यात बॅँकेच्या आजी-माजी ३८ संचालकांसह बॅँकेच्या ८० कर्मचाºयांनाही नोटिसा बजावल्या होत्या. या नोटिसींवर आपले म्हणणे मांडण्यासाठी संचालकांची धावपळ उडाली आहे.या संस्थांना वाटप केले कर्जजिल्हा बॅँकेच्या तत्कालीन संचालकांनी निफाड व नाशिक सहकारी साखर कारखान्याबरोबरच छगन भुजबळ यांच्या आर्मस्ट्रॉंग, हिरे कुटुंबीयांच्या रेणुका देवी यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित, श्रीराम सहकारी बॅँक, दिंडोरी तालुक्यातील ५ आदिवासी विकास कार्यकारी सोसायटी, सिन्नर तालुका बहुद्देशीय सहकारी संस्था, मालेगाव मधील १ वि. का. सोसायटीला कर्ज वाटप केले होते.अडचणीत आलेले संचालकसहकार विभागाने कर्ज वाटप प्रकरणात जबाबदारी निश्चित केलेल्यांमध्ये जिल्हा बॅँकेचे माजी अध्यक्ष, उपाध्यक्षांचा समावेश आहे. त्यात प्रामुख्याने शांताराम तात्या आहेर, माणिकराव बोरस्ते, अनिल आहेर, नानासाहेब सोनवणे, राजेंद्र भोसले, वसंत गिते, चंद्रकांत गोगड, माणिकराव शिंदे, अविनाश अरिंगळे, राजेंद्र डोखळे, शिरीशकुमार कोतवाल, नरेंद्र दराडे, चिंतामण गावित, दत्ता गायकवाड, सुचेता बच्छाव, परवेझ कोकणी, प्रशांत हिरे, राघोनाना आहिरे, धनजंय पाटील, जिवा पांडू गावित, गणपतबाबा पाटील, देवीदास पिंगळे, माणिकराव कोकाटे, संदीप गुळवे, यशंवत भोये, नानासाहेब पाटील, डॉ. शोभा बच्छाव, वैशाली अनिल कदम, तुकाराम दिघोळे, बबनराव घोलप, प्रसाद हिरे, शोभा दळवी, मंदाकिनी कदम यांचा समावेश आहे.जिल्हा बॅँकेनेही बजावल्या नोटिसादरम्यान, बँकेच्या गुरुवारी झालेल्या मासिक बैठकीत बिगरशेती संस्थाकडील कर्जवसुलीचा आढावा घेण्यात आला. त्यात बिगरशेती संस्थाकडे मोठ्या प्रमाणावर थकबाकी झाल्याने त्याच्या वसुलीसाठी तत्कालीन संचालकांच्या स्थावर मालमत्ता शोधून त्यावर बँकेचा बोजा लावण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी बँकेचे वरिष्ठ अधिकारी प्राधिकृत करण्यात आलेले आले असून, गुरुवारी निफाड सहकारी साखर कारखाना, नासिक सहकारी साखर कारखाना, श्रीराम सहकारी बँक नाशिक व इतर बिगर शेती सहकारी संस्थाच्या संचालकांवर व संबंधित अधिकाºयांसह सुमारे ५० जणांना कायदेशीर कारवाई करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या संस्थांना कर्ज जिल्हा बॅँकेच्या तत्कालीन संचालकांनी निफाड व नाशिक सहकारी साखर कारखान्याबरोबरच छगन भुजबळ यांच्या आर्मस्ट्राँग, हिरे कुटुंबीयांच्या रेणुका देवी यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित, श्रीराम सहकारी बॅँक, दिंडोरी तालुक्यातील ५ आदिवासी विकास कार्यकारी सोसायटी, सिन्नर तालुका बहुद्देशीय सहकारी संस्था, मालेगाव मधील १ वि.का. सोसायटीला कर्जवाटप केले होते.