नाशिक : ई-कनेक्टच्या तक्रारींचे निराकरण केले नाही. मंजूर कामाच्या निविदा विलंबाने काढल्या यासह विविध किरकोळ कारणावरून माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी चौकशी सुरू करण्याच्या केलेल्या घेतलेल्या निर्णयाला माजी शहर अभियंता उत्तम पवार यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. पवार यांच्या चौकशीसाठी नियुक्त केलेला अधिकारी सक्षम नसल्याचा पवार यांचा दावा असून, त्यामुळे त्यांनी या प्रकरणाला स्थगिती मागितली आहे.महापालिकेच्या सेवेत असताना तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अनेक अधिकाऱ्यांच्या चौकशीचे निर्णय घेतले तर काहींना निलंबित केले अनेक अधिकाºयांना तर बडतर्फच केले.आयुक्तांनीच सहा अधिकाºयांच्या चौकशीचा एक ठराव महासभेत मांडला होता. त्यात आजी-माजी अधिकाºयांचा समावेश असला तरी महापौर रंजना भानसी यांनी तसेच सभागृहानेही कोणाला पाठीशी घालणार नाही अशी भूमिका घेत ठराव मंजूर केला होता. त्यानुसार प्रशासनाने कार्यवाहीदेखील सुरू केल्या आहे. त्यात माजी शहर अभियंता उत्तम पवार यांचीही चौकशी होणार असून, २० आॅक्टोबर २०१८ रोजी त्यानुसार त्यांच्यावर दोषारोप पत्रदेखील ठेवण्यात आले आहे.
मुंढेंच्या विरोधात माजी शहर अभियंता न्यायालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 1:16 AM