येवला : शहराचे माजी नगराध्यक्ष दिनकरराव पाटील यांचे बुधवारी (दि.१२) आजाराने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. १९८९ ते १९९२ या कालावधीत दिनकर पाटील यांनी नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. १९७२ ते १९९६ अशी पंचवीस वर्षे ते नगरसेवक होते.नगरसेवक गणेश शिंदे यांचे ते चुलते तर नामवंत मल्ल काशिनाथ बापू शिंदे यांचे ते बंधू होत. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, तीन मुली, सुना, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे. बुधवारी सायंकाळी ५ वाजता शहरातील स्मशानभूमीत पाटील यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. संपूर्ण पंचक्र ोशी मध्ये पाटील यांचा शब्द प्रमाण मनाला जात असे. हिंदू- मुस्लिम बांधवांमध्ये शहरात एकोपा रहावा, यासाठी त्यांनी अव्याहतपणे प्रयत्न केला. हुडको वसाहतीचे शॉपिंग सेंटरचे काम, येवला विंचूर चौफुलीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात पाटील यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली होती. यसगाव पाणीपुरवठा योजना बाबत पाण्याचे आरक्षण करण्यात त्यांची मौलिक भूमिका होती. गावातील विहिरींची दुरु स्ती करून पाणी टंचाई दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.पाणी पुरवठ्याचा दुसऱ्या टप्प्यात मंजुरीसाठी त्यांनी सहकाऱ्यांसह प्रयत्न केले. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाल्याची प्रतिक्रि या अंत्यविधी दरम्यान उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
येवल्याचे माजी नगराध्यक्ष दिनकर पाटील यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 5:11 PM
१९७२ ते १९९६ अशी पंचवीस वर्षे नगरसेवक
ठळक मुद्देशहरातील स्मशानभूमीत पाटील यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.