नाशिक : दिंडोरी तालुका पंचायत समितीचे माजी सभापती अशोक (बापू) बाबूराव देशमुख (६०) यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्यामागे तीन भाऊ, पत्नी, मुले, मुली, सून, नातू असा परिवार आहे. दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आमदार निर्मला गावित, आमदार नरहरी झिरवाळ, कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे, माजी आमदार धनराज महाले, माजी आमदार रामदास चारोसकर, जिल्हा बँकेचे गणपतराव पाटील, मजूर फेडरेशनचे राजाभाऊ खेमनार, मार्केट कमिटीचे दत्तात्रय पाटील, अशोक बागमार, बाळासाहेब जाधव, प्रकाश शिंदे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रकाश वडजे, प्रमोद मुळाणे, योगेश हिरे, विश्वासराव देशमुख विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिंडोरी तालुक्यातील एक कणखर व निर्भिड नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना अनेक मान्यवरांनी व्यक्त केली. दोन महिन्यांपूर्वीच अशोक देशमुख यांचे ज्येष्ठ बंधू रामराव देशमुख यांचे निधन झाले होते.
दिंडोरीचे माजी सभापती अशोक देशमुख यांचे निधन
By admin | Published: June 27, 2015 12:20 AM