नाशिक - उध्दव सेनेचे माजी आमदार वसंत गिते यांचे मुंबई नाका येथील संपर्क कार्यालयावर हातोडा चालवल्या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने दखल घेतली आहे. या संदर्भात अगोदरच न्यायालयात याचिका दाखल असताना कारवाई करण्यात आल्याने कारवाई कशी केली याबाबत महापालिकेला विचारणा करणारी नोटीस पाठवण्यात आली आहे.
भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या दबावातून हे कार्यालय हटवल्याचा आरोप करण्यात आल्याने हे प्रकरण गाजत आहे. मुंबई नाका येथील माजी आमदार वसंत गीते यांचे संपर्क कार्यालय (दि.२) महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने हटवले. हे संपर्क कार्यालय महापालिकेच्या विकास आराखड्यात दाखवलेल्या रस्त्यावर असल्याचा महापालिकेचा दावा होता.
मात्र, ते महापालिकेच्या जागेत नसल्याचा दावा वसंत गिते यांनी केला होता. विशेष म्हणजे एका कार्यकत्य'ाने या कार्यालयाच्या संदर्भात महापालिकडे तक्रार केल्यानंतर नगररचना विभागाने प्रत्यक्ष पहाणी करून पीटी शीट तयार केले त्यावेळी हे कार्यालय डीपी रोडवर नव्हे तर राज्य परीवहन महामंडळाच्या जागेत म्हणजे महामार्ग बसस्थानकाच्या संरक्षक भीतींच्या लगत हे कार्यालय उभारण्यात आले आहे, तशी फाईल महापालिकेच्या नगररचना विभागाकडे असताना हे कार्यालय हटवण्यात आले. यापूर्वी महापालिकेने नोटीस बजावली त्याच वेळी वसंत गीते यांनी जिल्हा न्यायालयाच दावा दाखल केला होता.
त्यानुसार पुढील सुनावणी ३ जुलैस हेाणार असतानाच महापालिकेने २ जुलै रोजी हे कार्यालय हटवले. त्यामुळे काल म्हणजे ३ जुलैस झालेल्या सुनावणीत महापालिकेने न्यायालयात कोणत्याही प्रकारे म्हणणे मांडले नसताना हे कार्यालय कसे हटवले याबाबत नोटीसा पाठवण्याचे आदेश झाल्याची माहिती माजी आमदार वसंत गीते यांनी दिली.