शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

नाशिक जिल्हा महिला कॉँग्रेसच्या माजी अध्यक्ष शांताबाई छाजेड यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 6:50 PM

पार्थिवाची अंत्ययात्रा त्यांचे बंधू बाबुलाल बोरा यांच्या पेठरोडवरील दत्तनगरमधील निवासस्थानापासून गुरूवारी सकाळी १० वाजता अमरधामच्या दिशेने निघेल.

ठळक मुद्देगौतममुनीजी म.सा., स्नेहप्रभाजी महासतीजी यांच्याकडून ‘संथारा’ व्रत स्विकारले होते१९४२मध्ये झालेल्या रॉकेलच्या आंदोलनात छाजेड यांचा सक्रीय सहभाग

नाशिक : जिल्हा महिला कॉँग्रेसच्या अध्यक्षपद सुमारे २१ वर्षे भुषविणाऱ्या तसेच ममहिला विकास व एस.टी महामंडळाच्या संचालक राहिलेल्या शांताबाई बाबुलाल छाजेड (९२) यांची प्राणज्योत बुधवारी (दि.२२) संथारा व्रतामध्ये संध्याकाळी मालवली. त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा त्यांचे बंधू बाबुलाल बोरा यांच्या पेठरोडवरील दत्तनगरमधील निवासस्थानापासून गुरूवारी सकाळी १० वाजता अमरधामच्या दिशेने निघेल.शांताबाई छाजेड यांना ‘बाईजी’ नावाने ओळखले जात होते. त्यांचा जन्म २८ मे १९२८ साली दिंडोरी तालुक्यातील ‘रामशेज’च्या पायथ्याशी असलेल्या आशेवाडी गावात झाला होता. त्यांच्या जन्मापुर्वीच त्यांचे पितृछत्र हरपले होते. त्यांनी अनेक वर्षे जैन धर्मशाळेत शिक्षक म्हणून भावी पिढी घडविण्याचे कार्य केले. त्यांचे बंधू स्वातंत्र्यसैनिक किसनलालजी बोरा यांच्या प्रेरणेतून छाजेड या कॉँग्रेसमध्ये सक्रीय झाल्या. १९४६ साली नाशिकमध्ये झालेल्या अखिल भारतीय कॉँग्रेस अधिवेशनात देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्यासारख्या अनेक मोठ्या राष्टÑीय नेत्यांच्या भोजनसमितीची जबाबदारी त्यांच्याकडे होती. १९४२मध्ये झालेल्या रॉकेलच्या आंदोलनात छाजेड यांचा सक्रीय सहभाग होता. त्यांनी प.पू. गणेशालालजी म.सा. यांच्या प्रेरणेने अजन्मभर खादीचा अंगिकार केला होता. त्यांनी बुधवारी दुपारी संध्याकाळी गौतममुनीजी म.सा., स्नेहप्रभाजी महासतीजी यांच्याकडून ‘संथारा’ व्रत स्विकारले होते. दरम्यान, त्यांचे संध्याकाळी निधन झाल्याने परिसरात शोककळा पसरली. त्यांचे अंंत्यदर्शन घेण्यासाठी शहरातील कॉँग्रेसच्या विविध नेत्यांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली होती. 

टॅग्स :NashikनाशिकDeathमृत्यूcongressकाँग्रेस