शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस यांची निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2022 1:17 AM

येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सेवानिवृत्त कुलसचिव नानासाहेब रावजी कापडणीस (७०) यांच्यासह त्यांचा पुत्र अमित कापडणीस (३५, दोघे रा. आनंद गोपाळ पार्क, जुनी पंडित कॉलनी) यांचा गेल्या डिसेंबर महिन्यात दोन टप्प्यात निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासातून उघडकीस आली. पोलिसांनी कापडणीस पिता-पुत्रांच्या हत्याकांडप्रकरणी मुख्य संशयित व्यावसायिक आरोपी राहुल गौतम जगताप (३६, रा. आनंद गोपाळ पार्क) यास बुधवारी (दि.१६) पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याने पिता-पुत्रांचे मृतदेह दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये घेऊन जात पेटवून देत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देव्यावसायिकाला बेड्यागडगंज संपत्ती लाटण्यासाठी पित्यासह पुत्राचाही काढला काटाजिल्ह्याबाहेर मृतदेह पेटविले

नाशिक : येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सेवानिवृत्त कुलसचिव नानासाहेब रावजी कापडणीस (७०) यांच्यासह त्यांचा पुत्र अमित कापडणीस (३५, दोघे रा. आनंद गोपाळ पार्क, जुनी पंडित कॉलनी) यांचा गेल्या डिसेंबर महिन्यात दोन टप्प्यात निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासातून उघडकीस आली. पोलिसांनी कापडणीस पिता-पुत्रांच्या हत्याकांडप्रकरणी मुख्य संशयित व्यावसायिक आरोपी राहुल गौतम जगताप (३६, रा. आनंद गोपाळ पार्क) यास बुधवारी (दि.१६) पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याने पिता-पुत्रांचे मृतदेह दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये घेऊन जात पेटवून देत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

शरणपूर रोडवरील जुन्या पंडित कॉलनीमध्ये राहणारे कापडणीस पिता-पुत्र हे मागील काही वर्षांपासून एकटेच राहत होते. पत्नी व मुलगी नोकरीनिमित्त मुंबईत वास्तव्यास होते. अमित कापडणीस याने एम.बी.बी.एस.चे शिक्षण पूर्ण केले असून, तो कुठल्याही प्रकारची वैद्यकीय सराव करत नव्हता. दोघेही पिता-पुत्र एकाकी जीवन जगत होते. त्यांच्याच आनंद गोपाळ पार्क नावाच्या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या राहुल याने त्यांच्यावर ‘वॉच’ ठेवून अमितसोबत मैत्री केली. मैत्रीतून त्याने त्यांच्या स्थावर व जंगम मालमत्तेविषयी तसेच बँक, शेअर मार्केट, डिमेट खात्यातील गुंतवणूकविषयीची माहिती जाणून घेतली. गडगंज संपत्ती असल्याचे लक्षात आल्यानंतर राहुल याने थंड डोक्याने कापडणीस पिता-पुत्रांच्या हत्येचा कट रचल्याने पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी (दि.१६) सांगितले.

दरम्यान, कापडणीस यांच्या पत्नी, मुलगी हे मुंबईत वास्तव्यास असून, मागील काही महिन्यांपासून नाशिकस्थित पिता-पुत्रांच्या त्या संपर्कात नव्हत्या. दरम्यान, भाऊ अमितचा फोन लागत नाही व वडिलांचा फोन दुसऱ्याच कोणत्या तरी व्यक्तीकडे असून, त्याने फोन घेत उडवाउडवीची उत्तरे दिल्याने कापडणीस यांची कन्या शीतल यांनी नाशिक गाठले. यावेळी त्यांनी पुन्हा नानासाहेब कापडणीस यांच्या मोबाईलवर फोन केला असता, संशयित राहुल याने तो उचलला आणि शीतल यांची भेट घेतली. त्याने शीतल यांना ‘बंगल्याचे काम सुरू असल्यामुळे तुमचे वडील, भाऊ हे देवळाली कॅम्प येथील रो-हाऊसमध्ये शिफ्ट झाले आहे’ असे सांगितले. त्याच्या बोलण्याचा विश्वास करत शीतल या पुन्हा माघारी मुंबईला निघून गेल्या. यामुळे कापडणीस पिता-पुत्र बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांपर्यंत उशिराने पोहचली. पोलिसांनी राहुल यास न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

--इन्फो--

 

२८ जानेवारी रोजी बेेपत्ता झाल्याची दिली तक्रार

 

२८ जानेवारी २०२२ रोजी त्या पुन्हा नाशकात आल्या. मात्र त्यांची वडील, भाऊ यांच्याशी भेट होऊ शकली नाही, म्हणून त्यांना संशय आला व त्यांनी त्यादिवशी सरकारवाडा पोलीस ठाणे गाठून पिता व भाऊ बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. यानंतर पोलिसांनी उच्चभ्रू बेपत्ता झालेल्या पिता-पुत्रांचा शोध घेण्यास सुरुवात केली. या तपासात पोलिसांना त्यांचा घातपात राहुल यानेच केला असल्याचा संशय बळावला.

--इन्फो--

पिता-पुत्रांना संपविले अन् असा आला जाळ्यात

कापडणीस यांच्या खात्यातून शेअर्सची विक्री करून संशयित राहुल याने जमा झालेली रक्कम काढल्याने पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी त्यास चौकशीसाठी ताब्यात घेतले. तसेच त्याच्या दुकानाचा मॅनेजर प्रदीप शिरसाठकडेही चौकशी केली. त्याच्या बँकेच्या खात्यावर नानासाहेब यांच्या खात्यावरून मोठी रक्कम आरटीजीएसद्वारे वर्ग केली गेली होती. यामुळे पोलिसांना संशय आला. पोलिसांनी बँकेचे व्यवहार तपासून तात्काळ राहुल यास चौकशीसाठी ताब्यात घेतले.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी