सटाणा:बागलाण तालुक्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्याप्रमाणात वाढत आहे .गेल्या तीनच दिवसात चाळीस कोरोना बाधित रुग्ण आढळले असुन पैकी दोन जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे .आता कोरोना बाधितांचा आकडा तीनशे पार झाला असुन सटाणा शहर मात्र हॉटस्पॉट कायम आहे . बागलाण तालुक्यातील एकट्या सटाणा शहरात गेल्या महिना भरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत सव्वाशेच्यावर कोरोना बाधितांचा आकडा पोहचला आहे .कोरोनाचा प्रादुर्भाव आता जुन्या शहरातून नवीन वसाहतीकडे झाला आहे .गुरुवार (दि.२०)पासून गेल्या तीन दिवसात सटाणा शहरासह तालुक्यात तब्बल चाळीस कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहे .वैद्यकीय सूत्रांना प्राप्त झालेल्या अहवालात एकट्या सटाणा शहरात तब्बल १८ बाधित आढळले आहेत--------------------ग्रामीणमध्येही संसर्ग वाढला ...नामपूर गावात ५३ ,४२ वर्षीय पुरुष ,नामपूर येथील आंबेडकर नगर मध्ये ६६ ,४८ व ३६ वर्षीय महिला आढळून आल्या .ताहाराबाद येथील न्यू प्लॉट भागात ६८ वर्षीय पुरुष व ६० वर्षीय महिला ,जुन्या गावात ६१ ,४८ वर्षीय पुरुष कोरोनाबाधित आढळून आले .ब्राम्हणपाडे येथे नाशिकहून एक व्यापारी आल्याने त्यांच्या कुटुंबात त्याच्यासह तिघांना कोरोनाची लागण झाली .तर एका ४५ वर्षीय शेतक?्याला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले .तर अंतापूर येथे ४४ वर्षीय पुरुष व ३० वर्षीय महिला बाधित आहेत .जायखेडा येथे 48 वर्षीय पुरुष , औंदाणे येथे १८ वर्षीय तरुण धान्द्री (यशवंतनगर ) येथे ४० वर्षीय पुरुष ,मोरोणे सांडस येथे ५० वर्षीय महिला ,मुंजवाड येथे २६ वर्षीय तरुण ,द्याने येथे ४२ वर्षीय पुरुष अशा चाळीस जण बाधित आढळून आले आहेत .
बागलाणमध्ये कोरोनाचे तीन दिवसात चाळीस रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 4:58 PM