देवळाली कॅम्प : सिंधच्या शहनाई आणि भगवान झुलेलाल यांच्या जयघोषात संसरी येथील दारणा नदीपात्राजवळ सिंधी बांधवांच्या पवित्र मानल्या जाणाऱ्या ‘पूज्य चालीहा’ या व्रताचा शनिवारी समारोप करण्यात आला.चालीहा व्रताच्या निमित्ताने ४० दिवस व्रत करणाºया सिंधी बांधवांनी हातात बांधलेले रक्षासूत्र व गळ्यात घातलेले जानवे देवळालीच्या झुलेलाल मंदिरात पुजारी घनश्याम महाराज शर्मा यांनी विधियुक्त मार्गाने काढले. यावेळी व्रतस्थ असलेल्या भाविकांना व्रताच्या आचरणातून मुक्त करीत मंदिराच्या पुजारींनी आशीर्वाद दिला. पूज्य दर्याशाह संगत ट्रस्टच्या वतीने सकाळी १० ते १ वाजेदरम्यान व्रताचे उर्वरित विधी-भजन पार पडले. यावेळी मिरवणुकीत मूलचंद देहलानी, मोहन सचदेव, कॅन्टोन्मेंट बोर्ड उपाध्यक्ष भगवान कटारिया, सिंधी पंचायतीचे अध्यक्ष रतन चावला, हंसानंद नेहलानी, भरत दर्यानी, सुनील माखिजा, दीपक चावला, सुदेश आमेसर, मोहन मनवानी आदींसह सिंधी पंचायतीचे सदस्य व सिंधी महिला यांसह समाजबांधव उपस्थित होतेजलपूजनदेवळालीच्या झुलेलाल मंदिरापासून हौसन रोड, लामरोड मार्गे संसरी लेनमधून दारणा नदी तटापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत महिलांनी सिंध कि शहनाईच्या स्वरात मनसोक्त नाचण्याचा आनंद लुटला. यावेळी भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. जलपात्राजवळ मनोभावे जल व ज्योत पूजन, मटकी पूजन व भगवान झुलेलाल यांची आरती, अक्खा पावन मंत्र, पल्लव असे विधी केल्यानंतर मटकीचे विसर्जन करण्यात येऊन व्रताची सांगता करण्यात आली.
चालीहा व्रताचा उत्साहात समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2019 12:24 AM