देवळा : तालुक्यातील खर्डे येथील प्रगतिशील शेतकरी बापू गांगुर्डे यांनी आपल्या पावणे चार एकर क्षेत्रावरील मका पीक लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे सोमवारी नांगरूण टाकले . तालुक्यात सुरवातीच्या आठ ते दहा दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मका पिक पिवळे पडल्यानंतर पाऊस थांबल्यावर मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे संबंधित शेतकऱ्याने बियाणे तसेच मजूर व रासायनिक औषधे यावर जवळपास ४५ ते ५० हजार रु पये खर्च केला आहे . केलेला खर्च पुर्णत: निष्फळ ठरला आहे. मका पिक मोठे झाल्यावरही लष्करी अळीचा प्रादुर्भाव जाणवतो आहे म्हणून मका पिक घेतल्यानंतर निव्वळ खर्चही सुटणार नाही अशा विवंचनेत असलेल्या गांगुर्डे यांनी मका पिक नांगरण्यास सुरवात केली. मका हे कसमादे परिसरातील शेतकऱ्यांचे नगदी पीक असल्याने लागवड क्षेत्रात वाढ झाली होती, परंतु यंदाच्या हंगामात लष्करीची अवकृपा झाल्याने शेतकºयांमध्ये नामुष्की ओढवली आहे. महागडे बियाणे खरेदी करु न केलेली पेरणी वाया गेल्याने तालुक्यातील मका उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. गांगुर्डे कुटुंबियांकडून नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे.
देवळ्यात चार एकर मक्यावर फिरविला नांगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 1:03 PM