मागील अनेक वर्षांपासून गांधी तलावात बोटिंगचा व्यवसाय संबंधितांकडून केला जात आहे. काठालगत उभ्या केलेल्या चार मोठ्या बोटी अज्ञात समाजकंटकांनी मध्यरात्रीनंतर पेटवून देत परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. गुंड प्रवृत्तीच्या टोळक्याने केलेल्या या जाळपोळीत चारही बोटी जळून राख झाल्या आहेत. सकाळी जेव्हा हा प्रकार पंचवटी पोलिसांना समजला तेव्हा पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत जाळलेल्या बोटींची पाहणी केली. याप्रकरणी दुपारी उशिरापर्यंत कोणीही तक्रार नोंदविण्यासाठी पुढे आले नव्हते असे पोलिसांनी सांगितले. या जाळपोळीमागे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळक्याचा हात असल्याचे बोलले जात आहे. पूर्ववैमनस्यातून चारही बोटी जाळल्याची गोदाकाठावर चर्चा आहे.
रामकुंड हे धार्मिक तीर्थक्षेत्र असून शेकडो भाविक देवदर्शनासाठी गंगाघाटावर दररोज येतात. नदीपात्रात असलेल्या वाहत्या पाण्यात बोटींच्या माध्यमातून पर्यटक नौकाविहाराचा आनंद घेत असतात. याबाबत महापालिकेने एका ठेकेदाराला ठेका दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून स्मार्ट सिटीअंतर्गत कामे गोदाकाठालगत सुरू असल्याने नौकाविहार बंद करण्यात आले आहे. ठेकेदाराने त्याच्या ताब्यातील त्या चार बोटी गांधी तलावात कोपऱ्यात उभ्या करून ठेवल्या आहेत. बुधवारी पहाटेच्या सुमाराला अज्ञातांनी गांधी तलावात येऊन उभ्या चार बोटींना आग लावून त्या पेटवून दिल्या. बोटीला लाकूड आणि प्लॅस्टिक वापरलेले असल्याने काही वेळातच या बोटींचा जळून कोळसा झाला. याप्रकरणी पुढील तपास पंचवटी पोलीस करत आहेत.
-----
फोटो डेस्कॅनवर : २४ पीएचएमआर४२ : गांधी तलावातील बोटींचा झालेला कोळसा.
===Photopath===
240321\24nsk_6_24032021_13.jpg
===Caption===
गांधी तलावातील बोटींचा झालेला कोळसा.