नाशिक : खडी क्रशर यंत्र चालविण्याचा परवाना देण्याचा मोबदला म्हणून तक्र ारदाराकडून १० हजार रु पयांची लाच घेणाऱ्या महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या दोघांना तर बिअर शॉपीचा परवाना मंजुरीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाला लागणारा ग्रामपंचायत विभागाचा ना-हरकत दाखल देण्याच्या मोबदल्यात कनिष्ठ प्रशासन अधिका-यासह वरिष्ठ सहायकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी (दि.१९) सापळा रचून लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहाथ ताब्यात घेतले.घोटी येथील खडी क्र शर यंत्र चालविण्याचा परवाना मिळवण्यासाठी प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे अर्ज केला होता. मात्र परवाना देण्याच्या मोबदल्यात क्षेत्रिय अधिकारी तथा अतिरिक्त कार्यभार उपप्रादेशिक अधिकारी प्रकाश निवृत्ती धुमाळ (५६) यांनी तक्र ारदाराकडे २५ हजारांची लाचेची मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला खात्री पटल्यानंतर कार्यालयाच्या आवारात सापळा रचण्यात आला. यावेळी धुमाळ यांनी तक्रारदाराकडून लाचेच्या रकमेपैकी १० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले तसेच याच कार्यालयातील क्षेत्रिय अधिकारी दिनेशभाई भिका वसावा यांनीही १५ हजारांची लाच देण्याचा तगादा लावल्याने त्यांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले.जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागात कार्यरत संशयित आरोपी लोकसेवक कनिष्ठ प्रशासन अधिकारी वर्ग-३ प्रदिप बाबुराव बागुल व वरिष्ठ सहायक बाळु लक्ष्मण बोराडे यांनी तक्रारदाराकडे १२ हजारांची मागणी केली. यावेळी बागुल यांनी लाचेची रक्कम बोराडे यांच्याकडे देण्यास सांगितली असता पंच व साक्षीदारांसमवेत पथकाने रक्कम स्विकारताना रंगेहाथ ताब्यात घेतले. या दोन्ही कारवाया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाकडून करण्यात आल्या. नागरिकांनी शासकिय कार्यालयात कुठल्याही कामासाठी लाच देऊ नये, तसेच कोणी लाच मागितल्यास निर्भीडपणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन कडासने यांनी केले आहे.
जिल्हा परिषद, प्रदूषण मंडळातील चौघे लाचखोर अधिकारी ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 8:43 PM
नागरिकांनी शासकिय कार्यालयात कुठल्याही कामासाठी लाच देऊ नये, तसेच कोणी लाच मागितल्यास निर्भीडपणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन कडासने यांनी केले आहे.
ठळक मुद्देशासकिय कार्यालयात कुठल्याही कामासाठी लाच देऊ नये