शहरं
Join us  
Trending Stories
1
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
2
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
3
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
4
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
5
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
6
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
7
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
8
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
9
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
10
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
11
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
13
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
14
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
15
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
16
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
17
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
18
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

नागरेसह चौघांना न्यायालयीन कोठडी

By admin | Published: January 04, 2017 12:10 AM

बनावट नोटा प्रकरण : नाशिकरोड कारागृहात रवानगी

नाशिक : १ कोटी ३५ लाख रुपयांच्या बनावट नोटा छपाई प्रकरणात पोलीस कोठडीत असलेले संशयित संदीप सस्ते, छबू नागरे, रामराव पाटील व कृष्णा रामस्वरूप अग्रवाल या चौघांची मंगळवारी (दि़३) न्यायाधीश डी़ व्ही. देढीया यांनी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली़ या चौघांचीही पोलीस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते़ दरम्यान, संशयित अग्रवाल याच्याकडून पोलिसांनी संगणकाचा सीपीयू व हार्ड डिस्क जप्त केली आहे़  पुणे आयकर विभागाच्या माहितीनुसार आडगाव पोलिसांनी २२ डिसेंबरला मध्यरात्री मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल जत्रासमोर तीन आलिशान कार अडवून ११ संशयितांकडून १ कोटी ३५ लाख रुपयांच्या पाचशे व एक हजार रुपयांच्या बनावट नोटा, तर १़८० लाख रुपयांच्या जुन्या चलनातील नोटा जप्त केल्या होत्या़ पोलिसांनी संशयित नागरेच्या खुटवडनगरमधील आॅसम ब्यूटिपार्लरमधून बनावट नोटा छापण्यासाठीचे प्रिंटर, स्कॅनर, कटर मशीन, शाई, कागद जप्त करण्यात केले़ तसेच बँकेतील सुमारे ५८ लाखांची रक्कमही शोधून काढली़  पोलिसांनी अटक केलेल्या अकरा संशयितांपैकी रमेश पांगारकर, संतोष गायकवाड, डॉ़ प्रभाकर घरटे, ईश्वर परमार, नीलेश लायसे, गौतम जाधव, प्रवीण मांढरे, राकेश कारखूर यांची बारा दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर सोमवारी (दि़२) न्यायालयीन कोठडीत रवानगी केली़ तर उर्वरित संशयित संदीप सस्ते, छबू नागरे, रामराव पाटील-चौधरी व पोलिसांना शरण आलेल्या कृष्णा अग्रवाल यांना आणखी एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली़ या चौघांचीही कोठडीची मुदत संपल्याने त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते़ पोलिसांनी केलेल्या तपासात नागरे व पाटील हे नोटा छपाईतील प्रमुख सूत्रधार तर अग्रवाल टेक्निशियन असल्याचे समोर आले आहे़ तसेच आणखी ८० कोटी रुपयांच्या नोटा छापण्याचीही त्यांची तयारी होती़  दरम्यान, पोलिसांनी बनावट नोटांसाठीचा कागद कुठून आणला, कटर मशीनची खरेदी कोठून केली याचा तपास पूर्ण केला आहे़ तसेच येत्या चार दिवसांत या प्रकरणात आणखी मोठा खळबळजनक गौप्यस्फोट होणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे़ या प्रकरणातील बाराही संशयितांची आता नाशिकरोड कारागृहात रवानगी करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी) अग्रवाल हा बनावट नोटांचा टेक्निशियनपोलीस कोठडीतील संशयित कृष्णा रामस्वरूप अग्रवाल (३५, रा़ रुद्राक्ष सोसायटीच्या बाजूला, कामगारनगर, सातपूर) याच्याकडे पोलिसांनी स्वतंत्र चौकशी केली़ त्यामध्ये बनावट नोटा छपाईचे काम छबू नागरे करीत असला तरी यासाठी आवश्यक असलेले तांत्रिक सहाय्य अर्थात टेक्निकल एक्स्पर्टचे काम अग्रवालचे होते़ त्याच्याकडून पोलिसांनी नोटा स्कॅनिंग करण्यासाठी वापरलेला सीपीयू व हार्ड डिस्कही जप्त करण्यात आली आहे़ तसेच अग्रवाल हा पूर्वी झेरॉक्स मशीन चालवत असल्याचेही समोर आले आहे़