लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : शहरातील चार बाधित बाभुळगाव येथील अलगीकरण कक्षातून कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तालुक्यातील वाघाळे येथील ५५ वर्षीय पुरुषाची रॅपिड अँटिजेन टेस्ट अहवाल मंगळवारी (दि. ८) पॉझिटिव्ह आला आहे.दरम्यान, बाधितांच्या संपर्कातील ३९ संशयितांच्या स्वॅब अहवालांची प्रतीक्षा आहे. तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या ४४१ झाली असून, आजपर्यंत ३२५ बाधित कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत तर आत्तापर्यंत ३३ बाधितांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीला बाधित (अॅक्टिव्ह) रुग्णसंख्या ८३ असल्याची माहिती तालुका आरोग्य डॉ. हितेंद्र गायकवाड यांनी दिली.बाधितांपैकी बाभुळगाव येथील अलगीकरण कक्षात १६, होम कॉरण्टाइन ३५, नगरसूल येथील डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये १४, नाशिक जिल्हा रुग्णालयात ६ तर नाशिक येथील खासगी रुग्णालयात १२ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, गर्दीत जाणे टाळावे, हात सतत धुवावे, असे आवाहनआरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
येवल्यात चार कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2020 10:11 PM
येवला : शहरातील चार बाधित बाभुळगाव येथील अलगीकरण कक्षातून कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तालुक्यातील वाघाळे येथील ५५ वर्षीय पुरुषाची रॅपिड अँटिजेन टेस्ट अहवाल मंगळवारी (दि. ८) पॉझिटिव्ह आला आहे.
ठळक मुद्देबाधितांच्या संपर्कातील ३९ संशयितांच्या स्वॅब अहवालांची प्रतीक्षा आहे.