मालेगाव : कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावी बाधित नवजात बाळासह त्याच्या कुटुंबातील चार सदस्यांनी कोरोनावर मात केल्याने या कुटुंबास गुलाबपुष्पांच्या पाकळ्यांची उधळण करत महापालिकेच्या कोविड सेंटरमधून ‘डिस्चार्ज’ देण्यात आाला.मालेगाव महापालिकेच्या वैद्यकीय चमूने प्रशासनाच्या सहकार्याने आजपर्यंत ८७२ बाधितांपैकी ७३१ बाधिताना उपचाराअंती पूर्ण बरे करून घरी सोडण्यात आले आहे. त्यात बालकापासून वृृद्धांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी नवजात शिशुसह त्याचे माता व भावंडे पॉझिटिव्ह असल्याने आरोग्य प्रशासनाच्या तपासणीत निदर्शनास आले. कुटुंबासह नवजात बालकास कोणत्याही धोक्याविना कोरोनामुक्त करण्यासह सदृढ ठेवण्याचे आव्हान प्रशासनापुढे होते. त्यासाठी स्वतंत्र बालरोगतज्ज्ञ डॉ. भामरे यांची नियुक्ती करण्यात आली.कार्यक्रमास महापौर ताहेरा रशीद शेख, आयुक्त दीपक कासार, उपायुक्त नितीन कापडणीस, आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे, डॉ. हितेश महाले, डॉ. दानिश, दत्तात्रेय काथेपुरी, डॉ.स्वप्निल खैरणार, डॉ. सोहेल, विजय बाचकर यांची उपस्थिती होती.----------------------उपचाराअंती कुटुंब कोरोनामुक्त झाले असून, संपूर्ण कुटुंबास मनपाकडून पीपीई किट उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांना टाळ्यांच्या गजरात घरी सोडण्यात आले. महापालिकेने कुटुंबास आधुनिक वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिल्याने हा क्षण अनुभवयास मिळत असल्याचे कृतज्ञतापूर्ण उद्गार संबंधितांनी काढले.
मालेगावी चिमुकल्यासह चौघे कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 8:59 PM