मनमाड : लोकमान्य टिळक टर्मिनस दरभंगा पवन एक्सप्रेस च्या सर्वसाधारण बोगीत प्रवाशांना धारधार शस्त्राचा धाक दाखवून लूटमार करणार्या चार दरोडेखोरांना मनमाड रेसुब व लोहमार्ग पोलिसांनी जेरबंद केले आहे.रात्रीच्या अंधारात त्यांचे दोन साथीदार फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.समस्तीपूर बिहार येथील रिहवासी संजय रामलखन ठाकुर हे आपल्या सहकार्यांसह पवन एक्सप्रेस ने दरभंगा ते मुंबई असा सर्वसाधारण बोगीतून प्रवास करत होते. ही गाडी जळगाव रेल्वे स्थानकावर आली असता सहा तरु ण गाडीत बसले. गाडी सुरू होताच त्यांनी गाडीतील प्रवाशांच्या मानेवर धारधार सुरा ठेऊन धमकवण्यास सुरवात केली.एक एक प्रवाशाला शास्त्राचा धाक दाखवून शौचालया कडे नेऊन त्यांच्या जवळील पैशांची लूटमार केली.सदर प्रकारामुळे गाडीतील प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली.काही वेळाने प्रवाशांनी एकी करून चोरट्यांना विरोध करण्यास सुरु वात केली. मध्यरात्री च्या सुमारास गाडीमध्ये तुंबळ हाणामारी सुरू झाली. या मुळे महिला व लहान मुले भयभीत झाली.पानेवाडी रेल्वे स्थानका दरम्यान गाडी आली असता प्रवाशांनी गाडीची साखळी ओढून गाडी थांबवली. प्रवाशांनी चार चोरट्यांना पकडून ठेवले तर दोन चोरटे गाडीतून उतरून अंधारात फरार झाले.या घटनेची माहिती रेल्वे चालकाने मनमाड स्टेशन मास्तरांना कळवल्याने रेसुब निरीक्षक के डी मोरे व लोहमार्ग पोलीस निरीक्षक एन के मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांचे पथक फलाटावर हजर झाले. पवन एक्सप्रेस मनमाड स्थानकावर येताच चार चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी प्रवाशी संजय ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशियत आरोपी गोपाल नाना शेवरे ,आकाश शेवरे रा: वडाळी ता: चाळीसगाव, अंकूश अनिल पवार रा: वरणगाव, संजय अरु ण बोरसे, रा किंगाव ता यावल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडून चोरी केलेले 2300 रु पये रोख व एक सुरा जप्त करण्यात आला आहे.रेसुब चे अस्लम शहा, एम एम बेग, आर ए सोनवणे, गणेश भगारे, रजनीश यादव , लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वाल्मिक महाजन,आंबेकर, पारथी यांच्या पथकाने कार्यवाही केली.
पवन एक्सप्रेस मध्ये लूटमार करणारे चार दरोडेखोर मनमाड रेल्वे स्थानकावर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 6:28 PM
मनमाड : लोकमान्य टिळक टर्मिनस दरभंगा पवन एक्सप्रेस च्या सर्वसाधारण बोगीत प्रवाशांना धारधार शस्त्राचा धाक दाखवून लूटमार करणार्या चार दरोडेखोरांना मनमाड रेसुब व लोहमार्ग पोलिसांनी जेरबंद केले आहे.रात्रीच्या अंधारात त्यांचे दोन साथीदार फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
ठळक मुद्देप्रवाशांनी चार चोरट्यांना पकडून ठेवले तर दोन चोरटे गाडीतून उतरून अंधारात फरार झाले